थालीपीठ - पाककृती

थालीपीठ, पाककला - [Thalipeeth, Recipe] अनेक प्रकारची पीठे, भाज्या घातलेले थालीपीठ अतिशय लोहयुक्त आणि चवदार असते.
थालीपीठ - पाककृती | Thalipeeth - Recipe

अनेक प्रकारची पीठे, भाज्या घातलेले थालीपीठ


थालीपीठ - अनेक प्रकारची पीठे, भाज्या घातलेले थालीपीठ अतिशय लोहयुक्त आणि चवदार असते.थालीपीठ करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • एक वाटी गव्हाचे पीठ
 • एक वाटी ज्वारीचे किंवा हुरड्याचे पीठ
 • एक वाटी बाजरीचे पीठ
 • अर्धी वाटी बेसन पीठ
 • एक वाटी कोणतीही बारीक चिरलेली पालेभाजी
 • एक बारीक चिरलेला कांदा
 • पाऊण छोटा चमचा आलं - लसूण पेस्ट
 • चवीनुसार वाटलेली हिरवी किंवा लाल मिरची
 • चवीनुसार मीठ
 • अर्धा छोटा चमचा ओवा
 • आवश्यकतेनुसार तेल

थालीपीठ करण्याची पाककृती


 • प्रथम सर्व साहित्य एकत्र करा.
 • त्यात थोडे तेल व आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ मळून घ्या.
 • पीठ एक तास भिजत ठेवा.
 • भिजलेल्या पिठाचे छोटे - छोटे गोळे करा.
 • पोळपाटावर प्लॅस्टिकचा कागद किंवा ओले फडके घेऊन त्यावर गोळा हाताने थापा.
 • तव्यावर आवश्यकतेनुसार तेल टाका.
 • थापलेले थालिपीठ तव्यावर टाकून मंद आचेवर दोन्ही बाजूने लाल होईपर्यंत भाजा.
 • तयार झलेले थालिपीठ लोणचे किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

थालीपीठ

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.