कोबीचा उपमा - पाककृती

कोबीचा उपमा, पाककला - [Kobicha Upma, Recipe] नेहमीच्या गव्हाच्या रव्याचा एक नवीन चतपटीत प्रकार म्हणजे कोबीचा उपमा.
कोबीचा उपमा - पाककृती | Kobicha Upma - Recipe

नेहमीच्या गव्हाच्या रव्याचा एक नवीन चतपटीत प्रकार म्हणजे कोबीचा उपमा


कोबीचा उपमा - काहीसा नेहमीच्याच उपम्यासारखा पण अतिषय पौष्टीक आणि मस्त चटपटीत असा कोबीचा उपमा.कोबीचा उपमा करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • दोन वाट्या गव्हाचा रवा
 • दोन वाट्या चिरलेला कोबी
 • अर्धी वाटी मटारदाणे
 • एक छोटा चमचा उडीद डाळ
 • तीन छोटी गाजरे
 • ३ - ४ हिरव्या मिरच्या
 • अर्धी वाटी कोथिंबीर
 • एक लिंबू
 • चवीनुसार मीठ

फोडणीसाठी लागणारा जिन्नस


 • एक मोठा चमचा तेल
 • अर्धा चमचा जीरे
 • अर्धा चमचा मोहरी
 • अर्धा चमचा मेथ्या
 • अर्धा चमचा हळद
 • ५ - ६ कडिपत्त्याची पाने

कोबीचा उपमा करण्याची पाककृती


 • रवा स्वच्छ करा.
 • गाजराचे लांबपातळ तुकडे करा.
 • थोडे तेल गरम करा.
 • त्यामध्ये रवा टाकून ५ मिनीटे परता व लालसर रवा बाजूला काढून ठेवा.
 • नंतर एका पातेल्यात फोडणी करुन त्यात मटार, गाजराचे काप आणि गरम पाणी घालून अर्धवट शिजवा.
 • त्यानंतर त्यात रवा घाला.
 • आच कमी करा.
 • मिश्रणात कोबी घाला व पुन्हा काही वेळ शिजवा.
 • त्यावर लिंबाचा रस घाला.
 • गरम असतानाच वर कोथिंबीर घालून खायला द्या.

कोबीचा उपमा

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.