दिवाळ सणासाठी अगदी झटपट करता येण्याजोग्या कणकेच्या झटपट चकल्या
कणकेच्या झटपट चकल्या
कणकेच्या झटपट चकल्या करण्यासाठी लागणारा जिन्नस
- ३ वाट्या कणीक
- चवीनुसार तिखट
- चवीनुसार मीठ
- पाव चमचा हळद
- १ चमचा ओवा
- १ चमचा तीळ
- तळण्यासाठी तेल
कणकेच्या झटपट चकल्या करण्याची पाककृती
- कणकेत तीळ, ओवा, तिखट, मीठ व हळद घालावे.
- एका मलमलच्या कपड्यात सर्व वरील साहित्य बांधून अर्धा तास कुकरमध्ये वाफवावे.
- नंतर मोकळी करून पाण्याचा हात लावून मळावे.
- चकलीच्या सोर्यातून चकल्या बनवून गरम तेलात तळून घ्याव्यात.
- यात मोहन घालण्याची आवश्यकता नाही.
कणकेच्या झटपट चकल्या
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला