अळीवाच्या वड्या - पाककृती

अळीवाच्या वड्या, पाककला - [Alivachya Vadya, Recipe] गूळ, नारळ घातलेल्या रूचकर आणि चविष्ट अळीवाच्या वड्या.
अळीवाच्या वड्या - पाककृती | Alivachya Vadya - Recipe

गूळ, नारळ घातलेल्या रूचकर आणि चविष्ट अळीवाच्या वड्या


अळीवाच्या वड्या - कोलेस्टेरॉल, मधुमेह, बुद्धकोष्ठता हे विकार नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच अळीवामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. अ‍ॅनिमिया किंवा अशक्तपणा असलेल्या लोकांना अळीवाचे सेवन अतिषय चांगले असते. अशा आरोग्यदायी अळीवाचे सेवन रोजच्या न्याहारीत किंवा जेवणात केल्यास अनेक शारिरिक विकार दूर ठेवण्यास उपयोग होतो.अळीवाच्या वड्या करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • एक वाटी अळीवाचे दाणे
 • एक वाटी गूळ
 • एक वाटी खवलेला नारळ
 • अर्धी वाटी भाजलेली खसखस
 • एक चमचा तूप
 • अर्धा छोटा चमचा वेलची पावडर
 • अर्धा छोटा चमचा जायफळ पावडर
 • एक वाटी दूध

अळीवाच्या वड्या करण्याची पाककृती


 • अळीवाचे दाणे थोड्या तुपावर परता.
 • आता तुपावर परतलेले दाणे दुधात भिजत घाला.
 • अळीवाचे दाणे भिजल्यावर त्यात गूळ, खोबरे, खसखस घालून मंद आचेवर ठेवून घोटा.
 • घट्ट झाल्यावर त्यात वेलची, जायफळ पावडर घालून ताटात थापा.
 • थंड झाल्यावर वड्या पाडा.

अळीवाच्या वड्या

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.