झटपट होणारी मेथी घालून बटाट्याची चटपटीत भाजी
आलू मेथी - ‘क’ जीवनसत्वयुक्त मेथी घातलेल्या बटाट्याची चटपटीत भाजी म्हणजे आलू मेथी.
आलू मेथी करण्यासाठी लागणारा जिन्नस
- दोन वाट्या चिरलेली मेथी
- एक मध्यम आकाराचा बटाटा
- तीन मिरच्या
- चवीनुसार मीठ
आलू मेथी करण्यासाठी लागणार्या फोडणीचा जिन्नस
- एक मोठा चमचा तेल
- पाव चमचा मोहरी
- चिमुटभर हिंग
आलू मेथी करण्याची पाककृती
- बटाटा धुवून त्याच्या बारीक फोडी करा.
- मेथी निवडुन धुवून चिरुन घ्या.
- फोडणी करुन त्यामध्ये मिरची टाकून बटाट्याच्या फोडी टाका.
- फोडी शिजुद्या.
- फोडी मऊ झाल्यावर त्यात मेथी टाका.
- मीठ घालून भाजी परता आणि खाली उतरा.
आलू मेथी
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला