लापशी - पाककृती

लापशी, पाककला - [Lapshi, Recipe] अतिषय पौष्टिक, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी भरड्या गव्हाची लापशी.
लापशी - पाककृती | Lapshi - Recipe

अतिषय पौष्टिक, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी भरड्या गव्हाची लापशी


लापशी - मुळची गुजरात राज्यात लोकप्रिय असलेली लापशी ही एक अत्यंत उत्तम न्याहारी आहे. आरोग्यदायक असणाऱ्या भरड्या गव्हाची लापशी ही सणा उत्सवाला, समारंभाला देखील आवर्जून केली जाते.लापशी करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • अर्धी वाटी गव्हाची भरड (जाड दळलेला गहू)
 • अर्धी वाटी साखर किंवा किसलेला गूळ
 • अर्धा छोटा चमचा वेलची पावडर
 • तीन मोठे चमचे गरम दूध
 • तीन मोठे चमचे तेल किंवा तूप

लापशी करण्याची पाककृती


 • कढईत तेल किंवा तूप तापवून त्यात गव्हाची भरड तांबूस होईपर्यंत भाजा.
 • त्याचवेळी दीड वाटी पाणी दुसर्‍या भांड्यात तापवा.
 • पाणी तापल्यावर ते गव्हाच्या भरडीमध्ये घाला.
 • मिश्रण उकळवा.
 • गव्हाची भरड शिजू द्या.
 • नंतर त्यात साखर, वेलची पावडर मिसळा.
 • मंद आचेवर मिश्रण तापवा.
 • ते थंड होऊ द्या.
 • खायला देण्याआधी दूध मिसळून लापशी पुन्हा गरम करा.

लापशी

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.