पौष्टिक, आरोग्यदायी अशा अळूच्या पानांची खुसखुशीत, खमंग रूचकर अळूची वडी
अळू वडी - रक्तदाब, दृष्टीदोष, पोटाचे विकार, पानात असनारे फायबर पचनक्रिया सूरळीत होण्यासाठी सर्वोत्तम, सांधेदुखी आणि शरीराचे अधिकचे वजन नियंत्रीत करण्यासाठी मदत करणारे घटक अळुच्या पानांत असते. अशा आरोग्यदायी अळूच्या पानांची खुसखुशीत, खमंग रूचकर वडी जेवनात स्वाद तर आणतेच शिवाय आरोग्यास नक्कीच फायदेशीर ठरते.
अळू वडी करण्यासाठी लागणारा जिन्नस
- सहा - सात अळूची पाने
- दीड वाटी डाळीचे पीठ
- चार - पाच हिरव्या मिरच्या
- एक छोटा चमचा जीरे
- अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
- एक छोटा चमचा वाटलेले आले व लसूण
- पाव वाटी भिजवलेल्या चिंचेचा कोळ
- एक छोटा चमचा हळद
- एक छोटा चमचा खसखस
- थोडासा गूळ
- चवीनुसार मीठ
अळू वडी करण्याची पाककृती
- प्रथम अळूची पाने स्वच्छ धुवून घ्या.
- नंतर डाळीच्या पिठात वाटलेले आले व लसूण, हळद, खसखस, चिंचेचा कोळ आणि बारीक केलेला गूळ मिसळा.
- चवीनुसार मीठ घाला व पीठ भज्याच्या पिठासारखे सैलभर भिजवून घ्या.
- पाटावर एक अळूचे पान घेऊन त्यावर तयार केलेले पीठ सगळीकडे लावून घ्या.
- नंतर त्यावर दुसरे पान ठेवा व पुन्हा त्यावर पीठ लावून घ्या.
- अश्याप्रकारे सर्व पाने एकावर एक ठेवून तसेच पीठ लावून घ्या.
- आता त्या पानांची गुंडाळी करुन दोन्ही कडांनासुद्धा पीठ लावून बंद करा.
- पानांची सुरळी तयार आहे.
- आता कुकरमध्ये भांड्यात, इडलीपात्राच्या भांड्यात किंवा पाणी ठेवलेल्या भांड्यात चाळणी ठेवून त्यावर तेल लावा.
- तेल लावलेल्या भांड्यावर सुरळी ठेवा.
- साधारण १५ - २० मिनीटे वाफवून घ्या.
- चांगले वाफवल्यावर गॅस बंद करा.
- थंड झाल्यावर अळुवडीच्या सुरळीचे पातळ काप कापून घ्या.
- तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.
- तयार आहे खुसखुशीत अळूची वडी.
आरोग्यदायी अळूच्या पानांची खुसखुशीत, खमंग रूचकर वडी एकदा नक्की करून पहा.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला