डाळ आणि भाज्यांची इडली - पाककृती

डाळ आणि भाज्यांची इडली, पाककला - [Dal Ani Bhajyanchi Idli, Recipe].
डाळ आणि भाज्यांची इडली - पाककृती | Dal Ani Bhajyanchi Idli - Recipe

डाळ आणि भाज्यांची इडली


प्रत्येक हंगामाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या इडलीच्या पीठामध्ये टाकून तुम्ही इडलीचा स्वाद घेऊ शकता.डाळ आणि भाज्यांची इडली करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • अर्धी वाटी तूरडाळ
 • पाव वाटी मूगडाळ
 • अर्धी वाटी हरभरा डाळ
 • एक वाटी कापलेली मेथी
 • दोन वाट्या कापलेली कोथिंबीर
 • पाव वाटी ओला वाटाणा
 • ३ - ४ हिरव्या मिरच्या
 • एक बारीक चिरलेला लहान कांदा
 • पाव वाटी किसलेले गाजर
 • चवीनुसार मीठ

डाळ आणि भाज्यांची इडली करण्याची पाककृती


 • सर्व डाळी एकत्र धुवून तीन तास भिजत ठेवा.
 • डाळींमधील पाणी काढून बारीक वाटून घ्या.
 • त्यामध्ये मेथी, कोथिंबीर, उकडून बारीक केलेला ओला वाटाणा, किसलेला नारळ, चिरलेला कांदा, किसलेले गाजर व चवीनुसार मीठ घालून एकत्र मिश्रण तयार करा.
 • आवश्यक वाटल्यास पाणी घालून मिश्रण थोडे पातळ बनवा.
 • इडलीच्या साच्याला थोडे तेल लावून त्यात तयार मिश्रण घाला.
 • इडलीपात्र गॅसवर ठेवून इडली १० - १५ मिनीटे उकडून घ्या.
 • तयार आहे डाळ आणि भाज्यांची इडली.
 • इडली पुदिन्याच्या किंवा कोथिंबीरीच्या चटणीसोबत खायला द्या.

डाळ आणि भाज्यांची इडली

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.