चवळई मिश्र भाजी
तीन प्रकारच्या भाज्या एकत्र केल्यामुळे चवळई मिश्र भाजी अतिशय लोहयुक्त आणि पौष्टिक असते.
चवळई मिश्र भाजी करण्यासाठी लागणारा जिन्नस
- दोन वाटी चवळई
- एक वाटी पालक
- एक वाटी हरभर्याची पाने
- एक मोठा कांदा
- चार - पाच लसूण पाकळ्या
- चवीनुसार मीठ
- चवीनुसार तिखट
फोडणीसाठी लागणारा जिन्नस
- चार छोटे चमचे तेल
- पाव चमचा हळद
- अर्धा चमचा जीरे
- अर्धा चमचा मोहरी
- चिमूटभर हिंग
चवळई मिश्र भाजी करण्याची पाककृती
- सर्व भाज्यांची पाने स्वच्छ धुवून चिरून घ्या.
- एका कढईत फोडणी करुन त्यामध्ये कांदा व लसूण परतवा.
- त्यामध्ये सर्व चिरलेली पाने मिक्स करा.
- त्यावर मीठ, तिखट घाला.
- वरील मिश्रण मऊ होईपर्यंत परता.
- कढईवर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्या.
चवळई मिश्र भाजी
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला