बाजरीच्या कापण्या - पाककृती

बाजरीच्या कापण्या, पाककला - [Bajarichya Kapanya, Recipe].
बाजरीच्या कापण्या - पाककृती | Bajarichya Kapanya - Recipe

बाजरीच्या कापण्या


बाजरीच्या लोहयुक्त कापण्या बनवायला अतिशय सोप्या असतात.बाजरीच्या कापण्या करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • एक वाटी बाजरीचे पीठ
  • अर्धी वाटी किंवा आवडीप्रमाणे गूळ
  • दोन छोटे चमचे तीळ
  • तळण्यासाठी तेल

बाजरीच्या कापण्या करण्याची पाककृती


  • बाजरीचे पीठ आणि तीळ एकत्र करा.
  • नंतर गूळ थोड्या पाण्यात विरघळवा.
  • आता या पाण्यात बाजरीचे पीठ व तीळाचे मिश्रण भिजवून ते चांगले मळा.
  • मळलेले पीठ लाटून त्यांचे चौकोनी तुकडे करा.
  • तयार चौकोनी तुकडे गरम तेलात तांबूस होईपर्यंत तळा.

बाजरीच्या कापण्या

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.