हरभर्‍याच्या पानांची भाजी - पाककृती

हरभर्‍याच्या पानांची भाजी, पाककला - [Harbharyachya Paananchi Bhaji, Recipe].
हरभर्‍याच्या पानांची भाजी - पाककृती | Harbharyachya Paananchi Bhaji - Recipe

हरभर्‍याच्या पानांची भाजी


हरभर्‍याच्या पानांमध्ये लोह असते हरभर्‍याच्या पानांची भाजी चविष्टसुद्धा लागते.हरभर्‍याच्या पानांची भाजी करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • एक वाटी हरभर्‍याची कोवळी पाने
 • तीन छोटे चमचे बेसन पीठ
 • एक बारीक चिरलेला कांदा
 • एक छोटा चमचा आलं - लसूण पेस्ट
 • २ - ३ हिरव्या मिरच्या

फोडणीसाठी लागणारा जिन्नस


 • दोन छोटे चमचे तेल
 • अर्धा चमचा जीरे
 • अर्धा चमचा मोहरी
 • चिमूटभर हिंग

हरभर्‍याच्या पानांची भाजी करण्याची पाककृती


 • हरभर्‍याची पाने निवडून, स्वच्छ धुवून चिरा.
 • कढईत तेल गरम करून जीरे, मोहरी आणि हिंगाची फोडणी द्या.
 • त्यात हिरवी मिरची व कांदा मंद आचेवर तांबूस होईपर्यंत परतून घ्या.
 • नंतर त्यात आलं - लसूण पेस्ट टाका व पुन्हा परतून घ्या.
 • यात हरभर्‍याची पानं टाका व थोडावेळ शिजू द्या.
 • वरुन बेसन पीठ घालून हलवा आणि कढईवर झाकण ठेऊन मंद आचेवर शिजू द्या.
 • वाळलेली बोरे उपलब्ध असल्यास ती भाजीत टाकावीत म्हणजे भाजीला चव चांगली येते.

हरभर्‍याच्या पानांची भाजी

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.