मेथीचे बटाटे वडे
आपल्या नेहमीच्या बटाटेवड्यांमध्ये मेथी टाकली असता त्यांची चव बदलते आणि ते पौष्टिकही बनतात.
मेथीचे बटाटे वडे करण्यासाठी लागणारा जिन्नस
- एक लहान वाटी मेथीची पाने
- दोन मध्यम आकाराचे बटाटे
- अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ
- आवश्यक असल्यास एका लिंबाचा रस
- चवीनुसार मीठ
- चवीनुसार तिखट
- तळण्यासाठी तेल
मेथीचे बटाटे वडे करण्याची पाककृती
- मेथीची पाने धुअवून बारीक चिरुन घ्या.
- बटाटे उकडून त्यांची साले काढून चांगले मळा.
- त्यामध्ये तिखट, मीठ, मेथीची पाने मिसळा.
- या मिश्रणात लिंबाचा रस मिसळाला तरी चालतो.
- हरभरा डाळीचे पीठ भज्यांच्या पिठासारखे भिजवा.
- यामध्येही चवीप्रमाणे तिखट, मीठ घाला.
- बटाटा मिश्रणाचे लहान गोळे करुन हरभरा डाळीच्या पीठात बुडवा व गरम तेलात तळा.
मेथीचे बटाटे वडे
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला