Loading ...

कोबीची वडी - पाककृती

कोबीची वडी, पाककला - [Kobichi Vadi, Recipe].

कोबीची वडी - पाककृती | Kobichi Vadi - Recipe

कोबीची वडी


नेहमी नेहमी कोबीची भाजी खाऊन कंटाळा येत असल्यास कोबीची स्वादिष्ट वडी म्हणजे चांगला बदल होईल.



कोबीची वडी करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • एक वाटी किसलेला कोबी
  • अर्धी वाटी डाळीचे पीठ
  • ३ - ४ हिरव्या मिरच्या
  • एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट
  • अर्धा छोटा चमचा जीरे
  • पाव छोटा चमचा हळद
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

कोबीची वडी करण्याची पाककृती


  • किसलेल्या कोबीमध्ये आले - लसूण, हिरव्या मिरचीची वाटलेली पेस्ट, हळद, जीरे व मीठ टाका.
  • नंतर त्यामध्ये डाळीचे पीठ टाकून मिश्रण कणकेसारखे घट्ट मळा.
  • या मिश्रणाच्या सुरळ्या करुन त्या कुकरच्या डब्यात ठेवा.
  • कुकरमध्ये पाणी घालून डब्यातील सुरळ्या वाफवून घ्या.
  • कुकर उपलब्ध नसल्यास पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावर चाळणीत सुरळ्या ठेवा व चाळणीवर झाकण ठेवून वाफवून घ्या.
  • गार झाल्यावर त्याचे काप करुन तळा किंवा फोडणीवर परता.

कोबीची वडी

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची