गावामधले रस्ते - मराठी कविता

गावामधले रस्ते, मराठी कविता - [Gaavamadhale Raste - Marathi Kavita] पाऊल नाते सांगत होते, गावामधले रस्ते, यंत्र युगाने चोरून नेले, गावामधले रस्ते.
गावामधले रस्ते - मराठी कविता
व्यंगचित्र: हर्षद खंदारे
कवी प्रफुल्ल चिकेरूर यांची गावाकडच्या कविता प्रकारातील गावामधले रस्ते ही कविता मराठीमाती डॉट कॉम चे संपादक हर्षद खंदारे यांच्या आवाजात.
कवी: प्रफुल्ल चिकेरूर, आवाज: हर्षद खंदारे

पाऊल नाते सांगत होते गावामधले रस्ते यंत्र युगाने चोरून नेले गावामधले रस्ते कुठे हरवले प्रेमळ हळवे गावामधले रस्ते यंत्र युगाने चोरून नेले गावामधले रस्ते निःस्वार्थी निष्कपट प्रेम ते वेशीवरले सुस्वागत ते शिणली पाउले गोंजारीत ते गावामधले रस्ते पायाखाली असतानाही काळीज माया लावत होते आपुलकीच्या नात्यामधले गावामधले रस्ते ज्येष्ठत्वाचे सांगत नाते दरडावीतही होते या पिल्लांच्या सायंकाळी प्रतीक्षेतले रस्ते कुणी आजोबा पारावरती उगाच खरडत बसले होते चला स्वीकारू डांबरलेले गावामधले रस्ते यंत्र युगाने चोरून नेले गावामधले रस्ते

- प्रफुल्ल चिकेरूर

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.