कुठले पुस्तक कुठला लेखक - मराठी कविता

कुठले पुस्तक कुठला लेखक, मराठी कविता - कुठले पुस्तक कुठला लेखक, लिपी कोणती कसले भाकित, ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांची प्रसिद्ध कविता.
कुठले पुस्तक कुठला लेखक - मराठी कविता
चित्र: हर्षद खंदारे.
ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांची प्रसिद्ध कविता कुठले पुस्तक कुठला लेखक मराठीमाती डॉट कॉम च्या सह-संपादिका स्वाती खंदारे यांच्या आवाजात.
कवयित्री: शांता शेळके, आवाज: स्वाती खंदारे

कुठले पुस्तक कुठला लेखक लिपी कोणती कसले भाकित हात एक अदृश्य उलटतो पानामागुन पाने अविरत गतसालाचे स्मरण जागता दाटुन येते मनामध्ये भय पण हे नवे यात तरी का असेल काही प्रसन्न आशय अखंड गर्जे समोर सागर कणाकणाने खचते वाळू तरी लाट ही नवीन उठता सजे किनारा तिज कुरवाळू स्वतः स्वतःला देत दिलासा पुसते डोळे हसता हसता उभी इथे मी पसरून बाहू नवीन वर्षा तुझ्या स्वागता

शांता शेळके यांच्या वर्षा, या कविता संग्रहातून.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.