आंधळे प्रेम भाग ६ - मृण्मयी, अमेय व शिवानी या तीन सुखवस्तू तरूणांची एक पूर्ण प्रेमकथा म्हणजे इंद्रजित नाझरे यांची मराठी कथा आंधळे प्रेम.
मृण्मयी, अमेय व शिवानी या तीन सुखवस्तू तरूणांची एक पूर्ण प्रेमकथा आंधळे प्रेम
आंधळे प्रेम
गाडीतून जात असताना अमेयला मृण्मयीचे थोडे टेंशन वाटत असते. तो तडक घरी जातो. आपल्या रूममध्ये जाऊन लगेच शिवानीला `हाय' असा मेसेज पाठवितो. शिवानी ऑनलाईन असते. “कुठे होता माझा बाबू? मी वाट पाहत होते.” अमेय शिवानीला ताबडतोब त्याच्या घडलेली घटना सांगतो की कशी त्याची आणि मृण्मयीची ओळख झाली. मृण्मयीला कसे त्याच्याबद्दल आकर्षण वाटत गेले आणि आज घडलेली घटना. शिवानी एक उच्चभ्रू व खूप पुढारलेल्या विचारसरणीची मुलगी असते. ती अमेयला म्हणते की “काही काळजी करू नको. तू उद्या तिला CCD कॉफी शॉपवर बोलावून घे. मी बघते तिच्याशी काय बोलायचे ते.” शिवानीच्या बोलण्यावर अमेयला थोडे हायसे वाटते.
दुसऱ्या दिवशी तो मृण्मयीला एक मेसेज पाठवितो, “मला तू सकाळी ठीक ११:०० वाजता CCD कॉफी शॉपवर येऊन भेट.” मृण्मयीला तो मेसेज पाहून खूप आनंद होतो. तेव्हा सकाळचे ०९:३० झालेले असतात. मृण्मयी आज मोरपंखी रंगाचा टॉप व त्यावर ग्रे कलरची लेगिन्स व केशरचना मध्ये सागर वेणी आणि केसांची बट काढून छान आवरून अमेयला भेटायला CCD कॉफी शॉपवर ठीक ११:०० वाजता पोहोचते. ती कॉफी शॉपमध्ये प्रवेश करते आणि पाहते तर अमेय सारखाच एक मुलगा तिला पाठ करून एका सुंदर मुलीशी बोलत आहे. ती दारात उभी असते. बोलता बोलता शिवानीची नजर मृण्मयीवर पडते. शिवानी पाहताच मृण्मयीला ओळखते व नकळत डोळ्यांनी खूण करून अमेयला मृण्मयी तिथे आली आहे हे सांगते. अमेय खुर्चीवरून उठून उभा राहातो. मृण्मयी त्यांच्याजवळ येते. मृण्मयी शिवानीला पाहते. शिवानीही मृण्मयीला पाहते. अमेय एकमेकींना एकमेकांशी ओळख करून देतो.
शिवानी गुड फ्रेंड
शिवानी ही माझी गुड फ्रेंड मृण्मयी आणि मृण्मयी ही माझी fiancee शिवानी. मृण्मयी शिवानीची सुंदरता पाहतच राहते. शिवानी आज खूपच सुंदर पारंपारिक वेशात आलेली असते. डोळ्यांत काजळ, गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस त्यावर काळ्या रंगाची लेगिन्स आणि मोकळे सोडलेले केस. मृण्मयीला अमेयच्या तोंडून आलेले बोल आणि शिवानीला पाहून असे वाटते की आपल्याला जी व्यक्ती हवी आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यात आधीच एक सुंदर मुलगी आली आहे आणि यांचे लग्नही होणार आहे. मृण्मयी तिथे थोडी सॅड होते पण शिवानी आपल्या खोडकर स्वभावाने तिथले वातावरण नॉर्मल ठेवते. “हॅलो मृण्मयी, कशी आहेस?” शिवानी मृण्मयीला विचारते. मृण्मयीही क्षणात सगळे विसरून तिला “मी बरी आहे. तू खूप सुंदर दिसतेस शिवानी.” अशी कॉम्प्लिमेंट शिवानीला देते.
“मग, आय एम अ डायमंड गर्ल.” शिवानी आपल्या हातातील नखावर फुंकर मारीत म्हणते. “तू ही खूप गोड दिसतेस हं मृण्मयी.” शिवानी मृण्मयीला कॉम्प्लिमेंट देते. “मला खूप आनंद आहे कि माझ्या नवऱ्याची एक तुझ्यासारखी सुंदर मैत्रीण आहे.” “मलाही अभिमान आहे की माझ्या मित्राची तुझ्यासारखी सुंदर मुलगी fiancee आहे.” ते तिघेही तिथे बसून कॉफी घेतात. पण मृण्मयीचा थोडा भ्रमनिरास झालेला असतो. वरवर ती नॉर्मल दिसत असते. पण तिला थोडे वाईट वाटत असते. मृण्मयी त्या दोघांचे आभार मानून तिथून बाहेर पडते.
मिस ब्रोकन हार्ट
इतक्यात एक हँडसम तरूण तिच्यासमोर येऊन उभा राहतो. “हॅलो मिस ब्रोकन हार्ट...!” मृण्मयी वर मान करून त्याच्याकडे पाहते. तो मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून अच्युत अभ्यंकर हा मृण्मयीचा कॉलेजफ्रेंड असतो, जो एकेकाळी मृण्मयीवर प्रेम करत असतो आणि मृण्मयीचंही त्याच्यावर थोडे थोडके प्रेम असते. पण दोघेही मैत्रीचे नाते तुटेल म्हणून एकमेकांशी कधीच या विषयावर बोलत नसतात. पण मृण्मयीला आता खऱ्या अर्थाने जाणीव झालेली असते कि आपल्यालाही एका जीवनसाथीची गरज आहे व मृण्मयी अच्युतचे तिच्यावरचे खरे प्रेम ओळखत असल्याने मृण्मयी त्याचे गुलाब फुल घेऊन त्याचे प्रेम स्विकारते. मृण्मयी व अच्युत एकमेकांना अलिंगन देतात. त्या दोघांना अशा आनंदी अवस्थेत पाहून शिवानी व अमेयही खूप खुश होतात. अच्युत त्या दोघांनाही ‘डन’ असा रिस्पॉन्स देतो. एका वर्षानंतर ही जोडपी पुन्हा एकत्र येतात व ट्रिप म्हणून गोव्याला जातात.
प्रेमचा जन्म हा स्वर्गात होतो. प्रेमामध्ये साक्षात परमेश्वराचा निवास असतो. प्रेम हे कधीच त्रास किंवा अपमान आणि खजिलपणाने भरलेले नसते तर प्रेम हे मान-सन्मान, आपुलकी व आदर या तीन खांबावरती टिकून राहिलेले असते.
कथा समाप्त!
आंधळे प्रेम - मराठी कथा (कथेचे सर्व भाग)
- आंधळे प्रेम भाग १
- आंधळे प्रेम भाग २
- आंधळे प्रेम भाग ३
- आंधळे प्रेम भाग ४
- आंधळे प्रेम भाग ५
- आंधळे प्रेम भाग ६
अभिप्राय