प्रेम हे नावावर नसतं - भाग ७ - मराठी कथा

प्रेम हे नावावर नसतं - भाग ७,मराठी कथा - [Prem He Navavar Nasata - Part 7,Marathi Katha] ऑफिसचा पहिला दिवस.
प्रेम हे नावावर नसतं - भाग ७ - मराठी कथा | Prem He Navavar Nasata - Part 7 - Marathi Katha

ऑफिसचा पहिला दिवस

सगळ्यांची नाश्त्याची तयारी करून ती खोलीत जाते. अनिकेत तिथेच असतो. ती ड्रेसिंगरूममधे जाते, निळी जीन्स - व्हाईट टॉप काढते आणि तयारीला लागते. अनिकेतची नजर तिच्यावर जाते तसं तर तो तिला नेहमीच बघतं असतो पण आज ती जरा जास्तचं खुललेली, आनंदी असते.

थोड्या वेळातच ती गाणं हि गुणगुणत तयार होऊन खाली जायला निघते, अनिकेत पण तिच्या मागे-मागे खाली उतरतो. ते नाश्त्याचा टेबल जवळ येतात; बसतात सगळे शांततेत नाश्ता आटोपतात. अर्पिता लवकर आवरते आणि बॅग घेऊन बाहेर पडत असते.
तेवढ्यात सत्यजित विचारतात “अचल कुठे बाहेर जायची तयारी का?”

तिला काही क्षण सुचत नाही ती शांततेने अनिकेतकडे बघते. अनिकेतच्या ते लक्ष्यात येतं. तो लगेच उभा होतो आणि उत्तर देते “हो, मैत्रिणीकडे जातेय, मला सांगितलंय तिने.”
“बरं, कुठली गाडी नेतेस मी ड्रायव्हरला सांगतो तसं”, सत्यजित तिला बघत.

“काही गरज नाही मी तिला ड्रॉप करेन”, म्हणत तो अर्पिता सोबत बाहेर पडतो. गाडीत बसण्यास सांगून तिचा शेजारी स्वतः बसतो आणि ड्रायव्हरला गाडी काढण्यास सांगतो.

अर्पिता विचारात असते, जर ऑफिसच्या पहिल्याच दिवशी मला ह्यांनी इतक्या मोठ्या गाडीने सोडलं तर पहिल्या दिवशीच चर्चेला विषय असा काहीश्या विचारात असते ती, “मला माझ्या ऑफिसच्या अलीकडेच सोडा कारण कुणी बघितलं तर मला माझी ओळख लपवणं अवघड होईल.” म्हणत अर्पिता मान खाली घालते.

ऑफिस येतं, ती गाडी थांबवायला सांगते. ती उतरते, “थॅंक यु” म्हणत ती गाडीच दार लावते.

तो तिला न बघता बेस्ट ऑफ लक म्हणते व गाडीच्या काचा हळू हळू चढवतो. बघता-बघता गाडी तिच्या नजरेआड होते. अनिकेत तिच्या आकलन शक्तीच्या बाहेर असतो. तो काय? कोण? कसा? अशा सगळ्या प्रश्नांच्या विचार करत ती ऑफीसच्या मेन गेट मधून आत येते.

“हाय! गुड मॉर्निंग मॅम, हाऊ मे आय हेल्प यु?”

“हाय, आय एम अर्पिता सरनाईक.”

“ओह हाय मॅम, मी शिरीन, इथली रिसेप्शनिस्ट बॉसने कालच आम्हा सगळ्यांना तुमच्या जॉइनिंग बाबत कल्पना दिली.” ती हसत अर्पिताच स्वागत करते आणि तिला तिची जागा दाखवते.

नवीन ऑफिस, नवी जागा, नवा तिचा कॉम्पुटर सगळं नवीन असतं. तिला ते सगळे बघून आनंद आणि एक्साइटमेंट होत होती. नील तिची सगळ्यांना ओळख करून देतो. दिवस संपतो, संध्याकाळी ती आपल्या ऑफिसचा पहिला दिवस संपवून आनंदात घरी निघते. पण आता मात्र तिला काळजी असते घरातल्या सवयंपाकाची, सावित्री आईच्या तब्येतीची आणि ईतर गोष्टींची. पण तरी ती खुश असते म्हणून तितकसं विचार न करता ती घरी पोहोचते.

अर्पिता रूम मध्ये जाते फ्रेश होते आणि खाली उतरते, स्वयंपाक घरात जाते काय करू असा विचार करत ती स्वयंपाकाला लागते. जसे तसे ती स्वयंपाक उरकते.

अनिकेत घरी येतो आणि बैठकीत बसतो.
मुरारी “ताई साहेब, साहेब आलेत त्यांना चहा.”
ती पटकन चहा टाकते. मुरारी येतो आणि चहा घेऊन जातो. चहाचा पहिला घोट घेताच “ताई साहेब आल्यात” अनिकेत मुरारीला विचारतो.
“हो साहेब किचनमधे आहेत” मुरारी लगेच उत्तर देतो.

अनिकेत शांततेत चहा पितो आणि रूम मध्ये जातो. जेवणाची वेळ होते तो खाली येतो जेवण तयार असतं. टेबलवर जेवण आणलेलं असतं सगळे जेवायला बसतात जेवण आटोपतात. अर्पिता आत जाते. अनिकेत आल्यापासुन सावित्री आईला भेटला नाही म्हणून त्यांचा खोलीत जातो. दारात येतो तोच अर्पिताचा आवाज ऐकुन थांबतो.

“सावित्री आई जेवण नाही केलंत, तर बरं कसं वाटेल? आणि औषध पण घ्यायचेच आहे.” ती त्यांना घास भरवत. जेवण आटोपत, ती त्यांना औषध देऊन झोपवते. ताप कमी होत नसतो म्हणून ती त्यांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते. हे सगळ अनिकेत तिथेच उभा राहून बघत असतो.

तीचं आटोपलेलं बघून तो लगबगीने आपल्या खोलीत जायला निघतो. अर्पिता खोलीत जाते तिथे कुणी नसतं. अनिकेत तिथे स्टडी रूममधे असतो. रूम मधे कुणी नाही समजून अर्पिता आंघोळीला जाते. पण परत जुनी घटना घडू नये म्हणून ती दार लावते. आंघोळ आटपून ती टॉवेल गुंडाळून बाहेर येते व ड्रेसिंग रूमला जाते. गाऊन अडकवून ती बेडवर पडते.

हे सगळं अनिकेत स्टडी रूममधून बघत असतो. त्याला पहिल्या रात्रीच्या वागणुकीचा पश्चाताप होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्ट्याच्या टेबलवर सत्यजित, अनिकेत आणि अर्पिता असतात.

“अचल बेटा उद्या पासून काही महिने मी युरोपला आहे. दोन तीन महिने लागतील परत यायला”, सत्यजित अर्पिताला बघत बोलतो.
अर्पिता स्वीकारार्थी मान हलवत उत्तर देते.

क्रमशः


ऋचा पिंपळसकर | Rucha Pimplaskar
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लेखनाची अत्यंत आवड असणाऱ्या ऋचा पिंपळसकर मुळात एक कम्युनिकेशन ट्रेनर म्हणुन कार्यरत आहेत यांची स्वतःची एक वेगळी लेखनशैली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.