प्रेमाला कधीच नाव नसतं! हा विचार उलगडणारी प्रेमाची गोष्ट
“काय झालं सर, तुम्ही कसला ईतका विचार करताय? घरी सगळं ठीक आहे ना?” रोहित अनिकेतच्या काळजीपोटी. रोहित हा अनिकेतचा पर्सनल सेक्रेटरी आणि सोबतच त्याचा बालपणीचा मित्र पण असतो त्यामुळे त्या दोघांना एकमेकाचं सगळं माहित असतं म्हणून रोहित त्याला विचारतो.अनिकेत त्याला बघत “रोहित तुला मी सरनाईकांच्या मुलीची लग्न आधी माहिती काढायला सांगितले होते.”
“हो बॉस , का काय झालं?”, रोहित प्रश्नार्थी चेहऱ्याने त्याला बघत.
“कारण तू दिलेली माहिती आणि ती मुलगी दोघेही वेगळे आहेत मला असं वाटतं”, अनिकेत त्याला प्रश्न विचारत आणी स्वतःची शंका त्याला बोलून दाखवतो.
“काय? तिची संपूर्ण माहिती दिली आहे, काय खाते पासून तर तिच्या आवडी निवडी सुद्धा, त्या बद्दल बोलताय”, रोहित आश्चर्याने त्याला बघत विचारतो.
“म्हणूनच तर मला शंका आहे, कारण एखादी गोष्ट मुलीची लग्नानंतर बदलते माहितीये इथे ती अक्खी बदललीय”, अनिकेत शंकेत.
“म्हणजे”, रोहित काही न कळल्यासारखं.
“म्हणजे असं, कि ती जीन्स टॉप घालते, तीला स्वयंपाक करायला आवडतो, ती रोज सकाळी लवकर उठते, ती घरातल्या सगळ्या लहान मोठ्या माणसांची मनापासून काळजी घेते. ती एक मोठ्या एम्पायरच्या मालकाची मुलगी आहे तरी तिला छोट्या मोठ्या ऍडव्हर्टीसमेन्ट कंपनी मध्ये जॉब करायला आवडतो”, अनिकेत त्याला १ महिन्यातल्या सगळ्या घडामोडी सांगत.
“आणि ज्या मुलीबद्दल तु मला कळवलं होत ती याच्या अगदी विरुद्ध आहे”, अनिकेत त्यात आणखीन पारदर्शीपणे सांगतो.
“हऽऽऽम्म”, रोहित विचारात पडतो.
“पण मला एक कळलं ज्या मुलाच्यामागे कॉलेजमधे बाहेर सगळीकडे मुली मागे पडतात त्या मुलाने आजताक्यागत कुठल्या मुलीकडे बघितलं नाही तो आज एका मुलीबद्दल इतक्या छोट्यात छोट्या गोष्टी नोटीस करतोय आणि सांगतोय”, रोहित त्याचाकडे बघत हसतो.
“म्हणजे, तुझ म्हणणं काय आहे?” अनिकेत उगाच न ऊमगल्यासारखं विचारतो.
“खरंच तुला नाही कळलं मी काय बोलतोय”, रोहित उगाच त्याला छळत.
तो हसतो “जा जाऊन माहिती काढ! कोण आहे ती मुलगी जी माझी बायको आहे पण अनोळखी आहे”, तो रोहितला सांगतो.
तेवढ्यात अनिकेतचा फोन वाजतो आणि तो डेस्ककडे फोने घ्यायला वळतो.
क्रमशः