डील डे
अर्पिता आपल्या घरी परतलेली बघून तिच्या वडिलांना खूप आनंद होत असतो. पण अर्पिता मात्र अनोळख्या सारखी वागते आणि तिथून निघून जाते. तिला सगळंच आठवत असतं. तिच्या आईने प्रेमाने सगळं घर सजवलं असतं. त्या सगळ्या वस्तूंची जागा आता नवीन वस्तुंनी घेतलेली असते. ते घर, त्या घरातील सगळ्या वस्तू, भिंती तिला नवीन असतात अनोळखी असतात. ती सगळ्या गोष्टींना निरखून बघत असते.तेवढ्यात तिला मागून आवाज येतो “ताई साहेब” ती वळून बघते. तर तिच्या लहानपणी तिच्या सोबत एक चंदू नावाचा नौकर खेळायचा; तो तोच चंदू असतो. ती त्याला बघून खुश होते “अरे काका तुम्ही! कसे आहात तुम्ही?”
तिने त्याला ओळखले हेच त्याचा साठी खूप असतं.
तेवढ्यात मागून रेखा सरनाईक येते आणि चंदू जायला लागतो.
“चंदूऽऽऽ! ताई साहेबाना त्यांची रूम दाखवा”, रेखा चंदूला सांगते आणि अर्पिताकडे वळते.
“उद्या तुझ्या आजीचे ऑपेरेशन आहे पण अफसोस तुला तिथे जात येणार नाही कारण उद्या तुझं देखील कोर्टमॅरेज आहे आणि हो आणखीन एक; संध्याकाळी मोठी पार्टी आहे सरदेसाई आणि सरनाईक ह्यांच्या कॉन्ट्रॅक्ट साईनिंगची, पण हो एक लक्षात ठेव ही जागा आणि तुला मिळणारे पद हे माझ्या मुलीचे आहे, त्यामुळे अनिकेत सरदेसाई सोबत कुठलंही नातं तयार करायचा विचारही करायचा नाही आणि इथल्या कुठल्याही गोष्टींची त्यांना कानोकानी खबर होता कामा नये नाहीतर परिणाम तुझ्या आजीला भोगावे लागतील” अस म्हणत रेखा अर्पिताला बघत निघून जाते.
अर्पिता चंदूच्या मागे आपल्या खोलीत जाते “ताईसाहेब तुम्हाला काही खायला आणू? चंदू काळजी पोटी विचारतो.”
“अऽऽऽ नको मला भूक लागली नाही, तू ये आता” म्हणत अर्पिता दार लावते.
ती गादीवर बसते. तिला सगळं आठवत असतं. रेखा सरनाईक आणि तिच्या मध्ये जे डील झालेलं असतं ते म्हणजे आजीचं ऑपेरेशन आणि त्या बदल्यात अनिकेत सरदेसाईशी लग्न करणे व तेही त्यांची मुलगी अचल सरनाईक बनून.
अर्पिता तयार होते कारण तिच्याजवळ आपले म्हणणारं अशी फक्त तिची आजी असते. एक प्रशांत होता पण तोही तिला एकटं टाकून जातो. या सर्व विचारात अर्पिताला कधी झोप लागते कळत नाही.
क्रमशः