प्रेम हे नावावर नसतं - भाग २, मराठी कथा - [Prem He Navavar Nasata - Part 2, Marathi Katha] भूतकाळ, बाबा आई कुठेय ती दिसत का नाही.
भूतकाळ
“बाबा आई कुठेय ती दिसत का नाही, तिला काय झालय ती कुठेय, बाबा बोला ना तुम्ही बोलत का नाही?” एक निरागस इवलीशी पोर बाबानं पुढे हट्ट करत.ती निरागस पोर अर्पिता होती ती ५ वर्षांची असते. ती तिच्या आईची वाट बघत असते.
बाबा तिच्याकडे बघतात आणि तिला कवटाळून घेतात. ते इवलसं पोर आपल्या आईची वाट बघतं असतं पण तिची आई हि कधीच येणार नसते. तिच्या आईला कॅन्सर झालेला असतो व ती वारलेली असते. कित्येक दिवस ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असते म्हणून तिने तिला बघितलेलंच नसतं. त्या गोऱ्यापान, निळे डोळे आणि तोतडे बोलणाऱ्या गोजिऱ्या मुलीला आईला भेटायचं असतं.
शेवटी तिचे बाबा तिला सांगतात तुझी आई कधीच येणार नाही बेटा ती देवाघरी गेली म्हणत तिचे बाबा तिला बिलगून रडतात. तिला त्यातलं काहीच कळतं नसतं म्हणून ती बाबांना फक्त बघत बसते. ती रात्र तिचे बाबा विनायक सरनाईक तिला मिठीत घेऊन झोपतात. त्यांना हेच कळत नसत कि आता इचं काय इची काळजी कोण घेणार. असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात धुमसत असतात.
म्हणून ते दुसऱ्या दिवशी आशालता बाईंना घरी आणतात; त्या अर्पिताची संपूर्ण जबाबदारी घेतात. तिला न्हाऊ माखू घालणं तिच्याशी खेळणं सगळंच. अर्पिता तिला आजी म्हणत असते. तिचा दिवस तर आजी बरोबर जायचा रात्रपण कधी तरी ती आजीच्याच सोबत झोपायची. मात्र तेव्हा ती आजी सतत विचारायची “आजी आई कुठेय? बाबा म्हणतात ती देवा घरी गेलीय! आजी देवाघरी म्हणजे कुठे? किती लांब आहे ते गाव? आपण नाही का जाऊ शकत तिथे? किती दिवसांनी ती येईल? असे अनेक प्रश्न ती आजीला करत; ज्याची उत्तरं आजीकडे पण नसायची.
एका सकाळी अर्पिता झोपेतून उठते सकाळचं सगळं आवरून ती आपल्या रूम मधुन बाहेर पडते. नाश्त्याचा टेबलंवर बसते; आजी येते तिला दूध देत. ती सहज शेजारी बघते तिच्या बाबांच्या शेजारी एक बाई असते. ती तिला बघून हसते ती बाई पण हसते आणि दोघी नाश्ता करण्यात मग्न होतात. तीला न राहवून ती आजीला विचारते “आजी ह्या बाई कोण आहेत?”
आजी विनायक सरनाईकांना बघते ते हसत तिला सांगतात “अप्पू बाळा हि तुझी आई”.
ती आजीला बिलगते “हि माझी आई नाही, ती तर देवाघरी गेलीय न लवकर येईल ती.”
बाबा इतकं ऐकुन ऑफिसला निघून जातात पण ती बाईपण बाहेर पडते. काही महिने असेच जातात ती बाई एकदाही अर्पिताला जवळ घेत नाही याचं दुःख मात्र तिच्या बाबांना होत पण ते काहीच बोलत नाहीत. कितीदा तरी रात्री तिचे बाबा असतात पण नवीन आई नसते. ती बाबांना विचारते सुद्धा पण ते विषय टाळतात. ते कित्येकदा तिला समजावण्याचा प्रयत्न करतात अर्पिताला घेऊन तिला सेन्सेटिव्हपणा दाखवण्यास सांगतात पण काहीच अर्थ नसतो कारण ती आपल्याच पार्टी आणि मैत्रिणीच्या सोबत बिझी असते.
त्या दिवशी अर्पिता बाहेर बागेत खेळत असते पाऊस येतो ती पाऊसात भिजते, मनसोक्त खेळते. पण बागेतील मातीच्या चिखलात तीचे कपडे खराब होतात. ती तशीच ओल्याचिंब भिजलेल्या कपड्याने आणि चिखलाने माखलेल्या पायाने घरात धावत जाते. समोरून तिची नवी आई येत असते ती तिला धडकडे. तिची नवी आई किटी पार्टीला जाण्याच्या तयारीत असते; तीने नवी कोरी साडी नेसलेली असते जी अर्पितामुळे खराब होते. तिची साडी खराब झाल्याने ती अर्पितावर चिडते आणि तिला ढकलते. तसा अर्पिताचा तोल जातो आणि ती खाली पडते. तिला जखम होते आणि रक्त येतं.
ती आठवताच अर्पिता भानावर येते. त्या बाई समोरच उभ्या असतात. ती दुसरी तिसरी कोणी नसून सौ. रेखा सरनाईक असते. अर्पिताला आश्चर्य होत व ती गडबडते तिला त्यांना अशा ठिकाणी बघायची अपेक्षा नसते. त्यात त्यांनी मला ओळखलं कसं? की मीच त्यांना ओळखलं त्यांनी नाही? असे अनेक प्रश्न ती स्वतःलाच विचारत त्यांना बघते.
त्या येतात तिला मिठी मारता “अप्पू बाळा काशी आहेस? माझी कधी आठवण नाही का आली तुला?”, त्या तिच्या केसात हात फिरवत विचारतात.
ती अर्पिताला जवळ बसवत तिला कुरवाळत असतात. तिला ते विचित्र वाटतं कारण हे तिच्या करता नवीन असतं.
“माझी पोर ती किती सुंदर दिसते गं, अगदी आपल्या आई सारखी दिसतेस.” असं म्हणत ती परत अर्पिताला मिठी मारते.
तेवढ्यात तिथे नर्स येते ती अर्पिताला बघून “मॅडम हॉस्पिटलची फी भरायची राहिलीय.”
रेखा नर्स कडे पैसे देते “जितके हवे तितके भरून घ्या; उरलेले नंतरच्या फीस मध्ये ऍड्जस्ट करा.”
“अर्पिता मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय आपण बाहेर जाऊ शकतो?”, रेखा अर्पिताला बघत म्हणते.
अर्पिता खाली मान घालते होकार देते “हऽऽऽम्म.”
त्या दोघी कारमध्ये बसतात आणि जवळच एका कॉफी शॉप जवळ जाऊन गाडी थांबवतात. दोघी खाली उतरतात कॉफी शॉपमध्ये जातात आणि कॉर्नर सीट बघून बसतात.
“मला तुझी मदत हवीय त्या बदल्यात मी तुझ्या आजीच्या ऑपरेशनची पूर्ण जबाबदारी घेईन” रेखा अर्पिताला सांगते.
अर्पिता “मदत! कसली मदत? आणि मीच का करायची ती?”
रेखा तिला कारण सांगते. खरं तर तिला कारणांची गरज नसते काहीही असलं तरी ती त्यांना मदतीला तयार होणार असते कारण त्यामुळे तिच्या आजीचं भलं होणार असतं आणि डॉक्टर जे काही बोलतात ते तिच्या डोक्यात फिरत असतं तिला माहित असतं; ईतक्या लवकर ईतकी मोठी रक्कम दुसरं कोणीच देऊ शकत नाही.
ती होकार देते त्या दोघी कॉफी घेतात आणि तिथून बाहेर पडतात.
क्रमशः
अभिप्राय