आधुनिक शेती - मराठी कविता

आधुनिक शेती, मराठी कविता - [Adhunik Sheti, Marathi Kavita] अधुनिकतेची कास धरत चाललेल्या सर्व शेतकरी बांधवांस समर्पित कविता.
आधुनिक शेती - मराठी कविता | Adhunik Sheti - Marathi Kavita

अधुनिकतेची कास धरत चाललेल्या सर्व शेतकरी बांधवांस समर्पित कविता

नांगराची जागा आता
ट्रॅक्टरने घेतली
ग्रामीण भागात
आधुनिकता आली

माझा शेतकरी दादा
तंत्र वापरू लागला
साधनांच्या सहाय्याने
शेती करू लागला

आधुनिकतेनं दिली
शेतीची खात्री
श्रम आणि खर्चाला
बसू लागली कात्री

शासन मायबाप
आणतात नव्या योजना
मिटू लागली आता
शेतकऱ्यांची दैना

यंत्रतंत्राच्या मदतीने
शेती लागली फुलू
शेतकऱ्यांचे अच्छे
दिन झाले चालू

आधुनिकतेच्या युगात
शेतीला आला जीव
हिरवाईने नटू लागली
शेतीची शिव

- किशोर चलाख

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.