कडकलक्ष्मी

कडकलक्ष्मी - [Kadaklakshmi] कोल्हापूरच्या अंबाबाईचे भक्त.
कडकलक्ष्मी | Kadaklakshmi

कडकलक्ष्मी यांना कोल्हापूरच्या अंबाबाईचे भक्त म्हणून ओळखले जाते

कोल्हापूरच्या अंबाबाईचे भक्त कडकलक्ष्मी या नावाने देवीची एक घुमटी डोक्यावर घेऊन गावोगावी फिरतात व भिक्षा मागतात.

पुरुष व स्त्री अशी दोघे कडकलक्ष्मी हिंडवितात. पुरुष आपल्या कमरेभोवती घागऱ्याप्रमाणे लुगडे गुंडाळतो. तो लांब केस राखतो. बाईच्या उजव्या हातात मोरपिसांचा कुंचा असतो. पुरुष आधी धोलके वाजवून लोकांना गोळा करतो. बाई मग मागेपुढे सरकून छातीवर स्वस्तिकाकार हात ठेवून नमस्कार केल्याचा आणि अंगात संचार झाल्याचा अभिनय करते.

पुरुष एक आरोळी ठोकून स्वतःच्या खांद्यावरच्या आसुडाने स्वतःच्याच अंगावर फटके मारू लागतो. आपल्या दंडाभोवती एक दोरी बांधून त्यांत तो दाभणें खुपसतो. त्यातून रक्त वाहू लागले, त्री तो त्याची पर्वा करीत नाही. हे सर्व करीत असताना तो अंगात आल्यासारखे दाखवितो.

कडकलक्ष्मी गावात आली, की ज्यांनी तिला कधी नवस केला असेल, ते लोक तिची पूजा करतात. सर्वसामन्य लोकही कडकलक्ष्मीवाल्याला धान्य व पैसे देतात.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

1 टिप्पणी

  1. गेली अनेक दिवस कडकलक्ष्मी या विषयाबद्दल माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात होतो, मराठीमाती डॉट कॉमच्या मदतीने आज ती माहिती मला मिळू शकली आहे.
    या विषयाबद्दल अधिक सखोल माहिती आणि छायाचित्रे उपलब्ध करून दिल्यास उत्तम.
    धन्यवाद.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.