अननसाचा केक - पाककृती

अननसाचा केक, पाककृती - [Spongy Pineapple Cake, Recipe] चहा, कॉफी किंवा दुधासोबत मधल्या वेळेला साजेसा मऊ मुलायम अननसाचा केक.
अननसाचा केक - पाककृती | Spongy Pineapple Cake - Recipe

चहा, कॉफी किंवा दुधासोबत मधल्या वेळेला साजेसा मऊ मुलायम अननसाचा केक

अननसाच्या केकसाठी लागणारा जिन्नस

 • पाव कप अननसाचे तुकडे
 • १ कप मैदा
 • १ टी स्पून बेकिंग पावडर
 • पाव टी स्पून मीठ
 • अर्धा कप तेल
 • अर्धा कप साखर
 • २ अंडे
 • १ टी स्पून पायनॅप्पल किंवा व्हॅनिला इसेंस
 • पाव कप अननसाचा रस

अननसाच्या केकची पाककृती

 • सर्वप्रथम अननसांच्या तुकड्यांची प्युरी करुन घ्यावी.
 • त्यानंतर कढई किंवा कुकर गॅसवर मध्यम आचेवर साधारण १० मिनीटे गरम करायला (प्री हीट) ठेवावे.
 • तुमच्याकडे ओव्हन असल्यास १८० डिग्री से. ला १० मिनीटे प्री हीट करायला ठेवावे.
 • आता आपण केकचे मिश्रण तयार करू.
 • त्यासाठी एका वाडग्यावर चाळणी ठेवून त्यात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ टाकून चाळून घ्यावे.
 • हे मिश्रण २ - ३ वेळा चाळून घ्यावे जेणेकरून आपला केक स्पॉंजी होईल.
 • एका दुसर्‍या वाडग्यात तेल व साखर एकत्र करा. तुम्ही पीठी साखरही घेऊ शकता.
 • आता हे मिश्रण बीटरच्या किंवा हॅंड मिक्सरच्या साहाय्याने मिक्स करून घ्यावे.
 • मिश्रण मिक्स झाल्यावर त्यात एक अंड फोडून टाका व काही सेकंद बीट केल्यावर दुसरं अंड फोडून व्यवस्थित २ - ३ मिनीटे मिक्स करून घ्या.
 • सर्व मिश्रण नीट मिक्स झाले पहिजे.
 • आता यात चाळलेल्या मैद्याचे मिश्रण घालून व्यवस्थित एकत्र करा.
 • एकत्र झाल्यावर त्यात अननसाची प्युरी घालून पुन्हा एकत्र करा.
 • आता एसेंस टाकून एकत्र करून त्यात अननसचा रस घालून व्यवस्थित एकत्र करा.
 • मिश्रण एकसंघ झाले पाहिजे.
 • आता केकचा आयताकृती डबा घ्या, तो नसल्यास गोल डबा घेतला तरी चालेल.
 • त्या डब्याला सर्व बाजूने बटर चोळा.
 • मग या डब्यात तयार मिश्रण ओता व हलकेच भांडे २ - ४ वेळा आपटा जेणेकरून मिश्रणात बुडबुडे राहणार नाहीत.
 • आता हा डबा आपण प्री हीट करण्यासाठी गॅसवर ठेवलेल्या कढईत किंवा कुकरमध्ये स्टॅंड ठेवून त्यावर साधारण ४० ते ५० मिनीटे मंद आचेवर ठेवा.
 • जर तुम्ही ओव्हन वापरणार असाल तर १७५ डिग्री से. ला तापमान करून ३५ ते ४० मिनीटे बेक करा.
 • केक तयार झाला का नाही हे बघण्यासाठी तुम्ही त्यामध्ये एखादी काडी किंवा सुरी घालून बघू शकता; ती जर स्वच्छ बाहेर आली तर केक तयार झाला हे समजावे अन्यथा ५ ते १० मिनीटे अजून बेक करायला ठेवून द्यावे.
 • केक तयार झाल्यावर बाहेर काढून स्टॅंडवर ठेवावा. केकला पूर्ण थंड होऊ द्यावे.
 • केक थंड झाला की सुरीच्या साहाय्याने त्याच्या कडा सैल करून घ्याव्यात.
 • आता त्यावर प्लेट ठेवून डबा उलटा करावा. थोडसं थपकी मारून केक काढून घ्यावा.
 • केक सुलटा करून घ्यावा.
तयार आहे आपला अननसाचा केक.
तयार अननसाच्या केकचे छानसे तुकडे करून सर्व्ह करावे.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली / पाककला


1 टिप्पणी

 1. Khup chan explain kela aahe
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.