अंडा पाव - पाककृती

अंडा पाव, पाककृती - [Anda Pav, Recipe] न्याहारी किंवा मधल्या वेळेत लहान मुले आवडीने खातील असा अंडा पाव.
अंडा पाव - पाककृती | Anda Pav - Recipe

चविष्ट, रूचकर आणि पौष्टीक असा साधा-सोपा अंडा पाव

अंडा पावसाठी लागणारा जिन्नस
 • २ बन पाव
 • २ उकडलेली अंडी
 • १ मोठ्या कांदा
 • १ मोठा उकडलेला बटाटा
 • १ मध्यम टोमॅटो
 • २ चीज स्लाईस
 • काळी मिरी पावडर
 • चवीनुसार मीठ
 • मेयॉनीज

अंडा पावची पाककृती
 • सर्वात आधी कांदा, उकडलेला बटाटा व टोमॅटोची गोल कापं करून घ्यावीत.
 • सर्व कापांना काळी मिरी पावडर व मीठ लावावे.
 • अंड्यांचे चार - चार उभे काप करावेत. त्यांनाही काळी मिरी पावडर व मीठ लावावी.
 • बनपावाचे दोन मधून भाग करावेत. जर हवे असल्यास बटर लावून भाजून घेऊ शकता.
 • आता खालच्या भागाला मेयॉनीज लावावे.
 • त्यावर टोमॅटो, बटाट्याचे काप ठेवावेत.
 • काप ठेवल्यावर अंड्याचे २ काप ठेवावेत.
 • अंड्याचे २ काप ठेवल्यावर चीज स्लाईस ठेवावे.
 • आता पुन्हा त्यावर टोमॅटो व बटाट्याचे काप ठेवावेत आणि वरती बनपावाचा दुसरा भाग ठेवावा.
 • अश्याप्रकारे दुसराही अंडा पाव बनवावा.
 • टोमॅटो सॉससोबत अंडा पाव खाण्यास द्यावा.
झटपट होणारा ‘अंडा पाव’ हा न्याहारी किंवा मधल्या वेळेत खायला देऊ शकता. लहान मुले तर फारच आवडीने खातील.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.