पौष्टीक, साधा-सोपा लहान मुलांनाही आवडेल असा चिकनच्या रस्स्याचा प्रकार
चिकनच्या अळणी रस्स्यासाठी लागणारा जिन्नस
- पाव किलो चिकन
- १ मोठा कांदा
- १ चमचा आलं - लसूण पेस्ट
- पाव चमचा हळद
- चिमुटभर हिंग
- ७ - ८ काळी मिरी
- १ चमचा जीरे
- १ मोठा चमचा कांदा - खोबर्याचे वाटण
- चवीनुसार मीठ
- १ मोठा चमचा तेल/तूप
चिकनच्या अळणी रस्स्याची पाककृती
- सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्या.
- चिकनला आलं - लसूण पेस्ट, हळद व थोडेसे मीठ चोळून साधारण अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवा.
- कांदा बारीक चिरून घ्या.
- चिकन मॅरिनेट झाल्यावर एका पातेलीत तेल/तूप गरम करून घ्या.
- तेल गरम झाल्यावर त्यात जीरे घाला.
- जीरे फुलले की त्यात काळी मिरी टाका.
- आता त्यामध्ये कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परता.
- कांदा परतला की त्यामध्ये चिकन टाका व छान परतून घ्या.
- चिकन छानसे परतले कि त्यात साधारण २ वाट्या पाणी घाला (किंवा चिकन बुडेपर्यंत).
- चिकनला छान उकळी काढून घ्या.
- उकळी आल्यावर कांदा - खोबर्याचे वाटण घाला. व्यवस्थित ढवळून घ्या.
- चवीनुसार मीठ टाकून गॅस बारीक करून चिकन शिजायला ठेवा.
- चिकन मऊसूत शिजवून घ्या.
तिखट नसल्याने लहान मुलांनाही आवडेल असा हा रस्सा चिकनच्या रस्स्याचा प्रकार आहे.
चिकनचं साधं सोप्प सूप म्हणून किंवा लहान मुलांना सर्दी झाल्यास चिकनचा अळणी रस्सा नक्की ट्राय करून पहा.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ