Loading ...

झटपट तवा पुलाव - पाककृती (स्वाती खंदारे)

झटपट तवा पुलाव (पाककृती) - साधा सोपा आणि झटपट करता येणारा झटपट तवा पुलाव [Jhatpat Tawa Pulao Recipe].

झटपट तवा पुलाव - पाककृती (स्वाती खंदारे)

साधा सोपा आणि झटपट होणारा ‘झटपट तवा पुलाव’...


झटपट तवा पुलाव - पाककृती (स्वाती खंदारे)

(Jhatpat Tawa Pulao Recipe) ‘झटपट तवा पुलाव’



झटपट तवा पुलाव करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १ कप बासमती तांदूळ किंवा
  • २ कप शिजलेला भात
  • २ चमचे बटर
  • अर्धा चमचे जीरे
  • १ चमचा आलं - लसूण पेस्ट
  • पाव कप बारीक चिरलेली सिमला मिरची
  • पाव कप बारीक चिरलेले गाजर
  • पाव कप बारीक चिरलेली फरसबी
  • पाव कप मटार
  • अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो
  • १ चमचा पावभाजी मसाला
  • १ चमचा लाल मिरची पावडर
  • चवीनुसार मीठ

झटपट तवा पुलाव करण्याची पाककृती


  • आपण झटपट तवा पुलाव करणार आहोत त्यामुळे जर आपल्याकडे तयार भात किंवा शिळा भात असेल तर उत्तमच.
  • नसल्यास तांदूळ स्वच्छ धुवून त्याचा मोकळा भात तयार करून घ्या.
  • आता कढईत बटर गरम करून घ्या.
  • बटर गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे परतून घ्या.
  • जीरे परतल्यावर त्यात कांदा लालसर होईपर्यंत परता.
  • आलं - लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घ्या.
  • परतल्यावर त्यात सिमला मिरची, गाजर आणि फरसबी घालून ४ - ५ मिनीटे परतून घ्या.
  • मग त्यात टोमॅटो, मटार घालून पूर्ण शिजवून घ्या.
  • भाज्या शिजल्यावर त्या मॅश करून घ्या.
  • मॅश केल्यावर त्यामध्ये पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर व चवीनुसार मीठ टाका व परतून घ्या.
  • आता यामध्ये तयार मोकळा भात घालून व्यवस्थित परतून घ्या.
  • थोडेसे मीठ टाकून भाज्यामध्ये ४ - ५ मिनीटे व्यवस्थित भात परतून घ्या.
  • वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व थोडासा लिंबू रस घालून ढवळा.

तयार आहे झटपट तवा पुलाव.


स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


सर्व विभाग / जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची