विश्वव्यावी माय मराठी भाषेची थोरवी
माय मराठी गाजली
घेतला वसा संस्कृतीचा
अख्या जगाने मानली
माय मराठी गाजली
माझी भाषेची बोली
बीज प्रेमाचं रोवली
अन् भाषा मधुर
आहे मायेचा सागर
अहो नाही तिला तोड
माझी भाषा आहे गोड
परंपरेने नटली
माय मराठी गाजली
देते सर्वाना न्याय
मन करते धन्य
अन् ठेवला आदर्श
दिला ज्ञानाचा प्रकाश
अहो मराठी संस्कृती
सांगते संतांची महती
जनमनात ठासली
माय मराठी गाजली
- किशोर चलाख