वॉट्सप बिट्सप - मराठी कविता

वॉट्सप बिट्सप, मराठी कविता - [Whatsapp Bitsapp, Marathi Kavita] व्हॉट्सॲप सारख्या समाज माध्यमांचा मानवी मनावर होणारा परिणाम व्यक्त करणारी कविता.
वॉट्सप बिट्सप - मराठी कविता | Whatsapp Bitsapp - Marathi Kavita

व्हॉट्सॲप सारख्या समाज माध्यमांचा मानवी मनावर होणारा परिणाम व्यक्त करणारी कविता

जिकडे तिकडे ट्रिंग ट्रिंग
म्हणे आला वॉट्सप संदेश
याच्या वेडा पायी पोरं सोरं
करत आहे वेळेचा सत्यानाश

जो तो धरून दिसतो मोबाईल
चैन पडे न क्षणभर जीवाला
डिपी पायी झाले वेडेपिसे
काम नाही एकही हाताला

वॉट्सप अन् बिट्सप
आगा लावा रे त्याला
सेल्फीच्या नादापायी
जीव रे फुकट गेला

सगळीकडे सद्या क्रेझ डीपीची
आले नवनवीन ऍप भारी
तंत्रज्ञानाच्या युगात आता
मोबाईलची गगन भरारी

वॉट्सप चे झाले ग्रुप वर ग्रुप
रातभर चाले मेसेज चॅटिंग
झोप लागे न पोराला
ऐकू येई फक्त ट्रिंग ट्रिंग

आवर घाला आता तरी
या आपल्या वेडेपणाला
वॉट्सप च्या अतिसारामुळं
वेड लागेल साऱ्या जगाला

- किशोर चलाख

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.