नारळाची बर्फी - पाककृती

नारळाची बर्फी, पाककला - [Coconut Barfi, Recipe] सणासुदीला खासकरुन केली जाणारी तसेच नारळीपौर्णिमेला खाल्ली जाणारी गोड ‘नारळाची बर्फी’ तुम्ही इतर वेळीही बनवून मुलांना पटकन खाण्यासाठी देवू शकता. रक्षाबंधनच्या दिवशी तर खास भावाला बनवून खाऊ घालू शकता.
नारळाची बर्फी- पाककला | Coconut Barfi - Recipe

रक्षाबंधनसाठी खास गोड ‘नारळाची बर्फी’

‘नारळाची बर्फी’साठी लागणारा जिन्नस

 • ओला नारळ (७००-८०० ग्रॅम वजनाचा)
 • १ वाटी दूध
 • ३५० ग्रॅम साखर
 • अर्धा चमचा वेलची पावडर
 • १ लहान चमचा कापलेला पिस्ता

‘नारळाची बर्फी’ची पाककृती

 • ओला नारळ फोडून घ्या. फोडून झाल्यावर सर्व खवून घ्या.
 • गॅसवर जाड तळाच्या कढई ठेवून त्यात दूध, खवलेला नारळ व साखर मिसळून मिश्रण ढवळत रहा.
 • मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
 • एका ताटाला तूप पसरवून घ्या.
 • तूप लावलेल्या ताटात मिश्रण पसरा. सर्व बाजूने व्यवस्थित पसरा.
 • या मिश्रणावर वेलची पावडर व पिस्ता भुरभुरवा.
 • सुरीच्या सहाय्याने बर्फीच्या आकारात तुकडे कापून घ्या.
 • थंड झाल्यावर तुकडे काढून खाण्यास द्या.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली / पाककला


1 टिप्पणी

 1. chanस्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.