आई ही कुणाला नाही कळली, मुलांसाठी ती आयुष्यभर झटली
आई ही कुणाला नाही कळलीमुलांसाठी ती आयुष्यभर झटली
रक्ताचे पाणी तीने केले
मुलांना कौतुकाने वाढविले
सोन्याचे दागिने तीने विकले
मुलांचे शिक्षण तीने पुर्ण केले
मुलांसाठी कितीदा उपाशी राहीली
आई ही कुणाला नाही कळली
मुलांसाठी ती आयुष्यभर झटली
फाटकी साडी ती नेसली
तुटकी चप्पल तीने घातली
हाल अपेष्टा सहन करुनी
एक एक रुपया जमा करुनी
मुलांसाठी तीने माडी बांधली
आई ही कुणाला नाही कळली
मुलांसाठी ती आयुष्यभर झटली
इतके करुनही मुले विचारती
आई आमच्यासाठी तु काय केले
उपकार माझे ते विसरले
काय सांगावे बरे मी आता
मुलांसाठी कुठे कमी मी पडली
आई ही कुणाला नाही कळली
मुलांसाठी ती आयुष्यभर झटली