लेकरु - मराठी कविता

लेकरु, मराठी कविता - [Lekaru, Marathi Kavita] लेकरु माझं रुसून बसलं, कस एकातांत जाऊन बसलं.

लेकरु माझं रुसून बसलं, कस एकातांत जाऊन बसलं

लेकरु माझं रुसून बसलं
कस एकातांत जाऊन बसलं

बाळा तुझी मी रे आई
रागवु नको का तुला मी

मी रागवीते चांगल्यासाठी
तुझ्या बाळा भल्यासाठी

उगाच बोलले का रे तुला मी
जाऊ दे आता माझच चुकलं

लेकरु माझ रुसुन बसलं
कस एकातांत जाऊन बसलं

खाऊन घे रे बाळा तू
अन्नावरी रागावु नको तु

उपाशी असा राहू नको
त्रास मला देऊ नको

उपाशी राहिले मी तुझ्यामुळे
तर देव तुला मग रागवेलं

लेकरु माझं रुसून बसलं
कसं एकातांत जाऊन बसलं

हळूहळू कसं चोरून बघतं
लबाड लांडगं सोंग करतं

आईला ते मुद्दाम छळतं
दुरुन मग ते गंमत पाहतं

माझ्या पिशवीत बघ जरा तु
तुझ्यासाठी मी काय आणलं

लेकरु माझं रुसून बसलं
कस एकातांत जाऊन बसलं


यशवंत दंडगव्हाळ | Yashwant Dandgawhal
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.