एक होती आई, जी या जगात नाही
एक होती आईजी या जगात नाही
तीच्यासाठी गातो मी अंगाई
आई, आई, आई, आई
कुठे आहे माझी आई
तु होतीस जवळ जेव्हा
कधी उणीव भासली नाही
आता तुझ्या विना आई
मला मुळींच करमत नाही
आई, आई, आई, आई
कुठे आहे माझी आई
मला का तु दिसत नाही
कुठे हरवलीस तु आई
मला अशी कशी गं तु
विसरून गेलीस आई
आई, आई, आई, आई
कुठे आहे माझी आई
सगळ्या मुलांना त्यांची आई
किती किती जीव लावी
मी एकला परका तीथे
तुझ्या विना दिसतो आई
आई, आई, आई, आई
कुठे आहे माझी आई