विठ्ठल - मराठी कविता

विठ्ठल, मराठी कविता - [Viththal, Marathi Kavita] विठ्ठलाचे नाम घेतो आम्ही, विठ्ठलाचे काम करतो आम्ही.
विठ्ठल - मराठी कविता | Viththal - Marathi Kavita

विठ्ठलाचे नाम घेतो आम्ही, विठ्ठलाचे काम करतो आम्ही

विठ्ठलाचे नाम घेतो आम्ही
विठ्ठलाचे काम करतो आम्ही

कुणी म्हणे टाळकरी
कुणी म्हणे वारकरी
कुणी म्हणे टाळकरी
कुणी म्हणे वारकरी

नामधारी आहोत देवाचे आम्ही

विठ्ठलाचे नाम घेतो आम्ही
विठ्ठलाचे काम करतो आम्ही

नामामधे विठ्ठल
कामामधे विठ्ठल
नामामधे विठ्ठल
कामामधे विठ्ठल

नित्यची पाहतो विठ्ठल आम्ही
विठ्ठलाचे नाम घेतो आम्ही
विठ्ठलाचे काम करतो आम्ही


यशवंत दंडगव्हाळ | Yashwant Dandgawhal
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.