विठूराया - मराठी कविता
विठूराया, मराठी कविता- [Vithuraya, Marathi Kavita] विठ्ठल दर्शनघ्यावे सकळीक, ठेऊन मस्तक विटेवरी.
विठ्ठल दर्शन घ्यावे सकळीक
ठेऊन मस्तक विटेवरी
आषाढीची वारी देवा तुझ्या दारी
तीच सेवा खरीया देहाची
पुंडलिका घरी विठूराया आला
पांडुरंग झाला पंढरीला
विठ्ठल रुक्मिणी शेजारी शेजारी
हात कटेवरी ठेऊनीया
यशवंत म्हणे आला पांडुरंग
होऊनिया दंग अभंगात