रान - मराठी कविता

रान, मराठी कविता - [Raan, Marathi Kavita] रानावनामधी गाई ढोरं चरती, अंधार पडता परतुन येती.

रानावनामधी गाई ढोरं चरती, अंधार पडता परतुन येती

रानावनामधी गाई ढोरं चरती
अंधार पडता परतुन येती

वासरु हरले रस्ता चुकले
गाय ती माय हंबरडा फोडी
वासराले ती शोधत जाई
दिसताच वासरु धावत येई
वासराले ती चाटून घेई
डोळ्यात तीच्या पाणी येई
जनावरालेही किती माया असती

रानावनामधी गाई ढोरं चरती
अंधार पडता परतून येती

चरता चरता भानं हरपली
कळप सुटला मागे पडली
हिंस्त्र प्राण्यांचा आवाज येई
गाय ती घाबरून जाई
कळपाचा ती शोध घेई
दिसता कळप जीव भांड्यात येई
जनावरालेही किती भीती असती

रानावनामधी गाई ढोरं चरती
अंधार पडता परतून येती

यशवंत दंडगव्हाळ | Yashwant Dandgawhal
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.