टाळ कुटतो रे तू टाळ कुटतो, मनी नाही भाव अन देवाला पुजतो
टाळ कुटतो रे तू टाळ कुटतोमनी नाही भाव अन देवाला पुजतो
कशाला रे देवाला असं फसवतो
टाळ कुटतो रे तू टाळ कुटतो
दिवसभर ह्याच्यात्यांच्या चहाड्या करतो
अन इथ येऊन लोकांना किर्तन सांगतो
गळ्यामध्ये तू रे माळ घालतो
नको तेव्हा का खुटीला टांगतो
टाळ कुटतो रे तू टाळ कुटतो
मनी नाही भाव अन देवाला पुजतो
कशाला रे देवाला अस फसवतो
टाळ कुटतो रे तू टाळ कुटतो
कपाळावरी केसरी गंध लावतो
तोडातूनी तंबाखूचा दूर्गंध येतो
ब्रम्हचर्याच्या तू किती गोष्टी सांगतो
बायाबापड्याचा का तू छंद जपतो
टाळ कुटतो रे तू टाळ कुटतो
मनी नाही भाव अन देवाला पुजतो
कशाला रे अस देवाला फसवतो
टाळ कुटतो रे तू टाळ कुटतो
पंदरपुरी विठ्ठलाला तू नेहमी भेटतो
गावातील विठ्ठलाला सांग कधी पुजतो
गंगेमधे तू रे किती आंघोळ करतो
मनाने सांग तू किती स्वच्छ होतो
टाळ कुटतो रे तू टाळ कुटतो
मनी नाही भाव अन देवाला पुजतो
कशाला रे देवाला अस फसवतो
टाळ कुटतो रे तू टाळ कुटतो
दिवसभर तू रे किती उपास करतो
सांग तू पोटाला रे किती उपाशी ठेवतो
दान धर्माच्या रे किती गोष्टी करतो
स्वतः किती केले कधी सांगतो
टाळ कुटतो रे तू टाळ कुटतो
मनी नाही भाव अन देवाला पुजतो
कशाला रे देवाला अस फसवतो
टाळ कुटतो रे तू टाळ कुटतो