श्रावणाच्या सरी, सरींचा पाऊस, थंडावलेल्या ढगांत थेंबांची धूसपूस
श्रावणाच्या सरी, सरींचा पाऊस
थंडावलेल्या ढगांत थेंबांची धूसपूस
फुगलेली बेडकं, साचलेलं पाणी
बेसूर तरीही आनंदाची गाणी
घंट्यांची किणकिण, गाईचा हंबरडा
नवं कोरं वासरू अन् भिजलेला वाडा
गावाच्या वेशीवर खळखळ ओढा
झुलणारी पिकं आणि हरपलेली पिडा
बेभान वारा, गर्जणारे ढग
चमचमणाऱ्या विजा, साऱ्यांचीच लगबग
मृगेची आठवण, धरतीला वाण
पदरात पाऊस आणि बहरलेलं रान