मराठीण - मराठी कविता

मराठीण, मराठी कविता - [Marathin, Marathi Kavita] मी मर्द मराठीण, मी आहे वाघीण.

मी मर्द मराठीण, मी आहे वाघीण

मी मर्द मराठीण
मी आहे वाघीण

तलवार हाती घेईन
लक्ष्मीबाई होईन
इंग्रजांनाही मी
पळवून लावीन

मी मर्द मराठीण
मी आहे वाघीण

मी जिजाऊ होईन
शिवबा घडवीन
हिंदवी स्वराज्याचे
तोरण बांधीन

मी मर्द मराठीण
मी आहे वाघीण

मी सावित्री होईन
घरोघरी जाईन
ज्ञानाचा दिवा
मीच लावीन
मी मर्द मराठीण
मी आहे वाघीण


यशवंत दंडगव्हाळ | Yashwant Dandgawhal
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

२ टिप्पण्या

 1. नमस्कार !
  मला तुमच्या काव्य ग्रूप मध्ये ॲड करावे

  कवी - कि.र.आरके भोकरदन महाराष्ट्र
  9762049003
  1. नमस्कार,
   माराठीमाती डॉट कॉमच्या विविध ग्रुप्स मध्ये जोडले जाण्यासाठी हा दुवा पाहा: https://www.marathimati.com/p/whatsapp.html
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.