तू आणि मी - मराठी कविता

तू आणि मी, मराठी कविता - [Tu Aani Me, Marathi Kavita] मी राजा तु माझी राणी, चल पावसात गाऊ गाणी.

मी राजा तु माझी राणी, चल पावसात गाऊ गाणी

मी राजा तु माझी राणी
चल पावसात गाऊ गाणी

चिंबचिंब भिजून बेधुंद होऊ
मिठीत घेऊन प्रेमगीत गाऊ
मी फुलपाखरू तु फुलराणी

मी राजा तु माझी राणी
चल पावसात गाऊ गाणी

गार गार बेधुंद हा गारवा
वाटे सुगंध हा मातीचा घ्यावा
मी आकाश तू माझी धरणी

मी राजा तु माझी राणी
चल पावसात गाऊ गाणी


यशवंत दंडगव्हाळ | Yashwant Dandgawhal
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.