माझी तु का रे, घेतोस परिक्षा
माझी तु का रेघेतोस परिक्षा
विश्वास नाही का
तुला माझा
सांग ना रे
हे श्रीरामा
चारित्र्य वान आहे
माहिती तुला
मग का घेतो
तु अग्निपरीक्षा
सांग ना रे
हे श्रीरामा
जरी दिली मी
अग्निपरीक्षा
तरी पाठविले तु
मला वनवासा
सांग ना रे
हे श्रीरामा
एक पत्नीव्रता तु
जगी मिरवतो
अश्वमेध यज्ञाला
पुतळा बसवितो
सांग ना रे
हे श्रीरामा
उशीर झाल्यावर
तु न्यायला आला
वाट बघत होते मी
तेव्हा का नाही आला
सांग ना रे
हे श्रीरामा