कलाजगत, स्मशान शांतता आणि काश्मीर - माझं मत

कलाजगत, स्मशान शांतता आणि काश्मीर, माझं मत - [Kalajagat Smashan Shantata aani Kashmir, Opinion] जेव्हा मोठे कलाकार या देशाच्या जनतेने मोठे केले तेच देशातील सर्वात मोठी घटना घडली असता शांत का बसतात?.

मोठे कलाकार या देशाच्या जनतेने मोठे केले तेच देशातील सर्वात मोठी घटना घडली असता शांत का बसतात?

Silence is the perfect expression of scorn
- G.B.Shaw
एक माणूस आणि कलाकार म्हणून हा लेखन प्रपंच. शक्यतो मी सोशल मीडियावर लिहिणे टाळतो कारण उगाचच मग उत्तरे द्यावी लागतात. पण कधी कधी दुःख याचे वाटते कि जेव्हा मोठे कलाकार या देशाच्या जनतेने मोठे केले तेच देशातील सर्वात मोठी घटना घडली असता शांत का बसतात?

कारण त्यांच्यासाठी एकतर जे चित्रपट निर्माण होतात त्यांचा प्रेक्षकवर्ग कुठे कुठे आहे ? कुठल्या समाजाचा आहे. जर त्या देशात, भागात आपला चित्रपट अयशस्वी झाला ? कारण जर मी माझ्या देशाला सपोर्ट केला तर तिकडची लोक माझा चित्रपट पाहणार नाहीत. शेवटी पैसा जास्त महत्वाचा. देशविरोधी चित्रपट काढला तर पाहणारे मूर्ख या देशातंपण आहेतच. कारण आपले शहाणपण मिरवण्यासाठी अश्या विषयांवर चर्चा करणे जास्त सोपे. ज्या मातीतील धान्य खायचे, पैसे कमवायचे, आणि पोट भरल्यावर मग आपण देशाविरोधात बोलायला उचलली जीभ लावली टाळ्याला. आपला दुसरा भाऊ सैन्यात आहेच कि मरायला तयार. आज या लोकांनी दाखवून दिले कि कितीही सामाजिक विषयावर चित्रपट काढले तरी आतून ते देशविरोधीच आहेत. आपले मत विरोधी असले तरी ते मांडू शकतात. पण त्यांना मलिदा दोन्ही कडून खायचा आहे. यातून त्यांनी दाखवून दिले कि यांचा बोलविता बाप दुसरीकडे बसलाय.

किमान तरुणाईने आणि मातापित्यांनी ओळखावे चित्रपटाने किंवां अभिनेते/ अभिनेत्री / दिग्दर्शक देश का बदलू शकत नाही (अपवाद वगळता). कारण सरतेशेवटी चित्रपट हा पैसे कमवायचे साधन असतो. त्यानंतर वेगवेळे ब्रॅण्ड्स च्या जाहिरातीदेखील असतात आणि यांची तहान कैक करोडो रुपयांनी देखील भागात नाही. संपूर्ण कुटुंब खोऱ्याने पैसे ओढण्यात मग्न मग थोडासा वेळ देशासाठी का नाही ?यांना जगातल्या सर्व विषयांवर बोलायला वेळ आहे (ट्रम्प , LGBT, सिरीया , व्यक्तिस्वातंत्र्य...) पण जर देशाच्या बाजूने स्टॅन्ड घेतले तर एक मोठा वर्ग आणि पैश्याला सोडावे लागेल. जर कोटी कोटी जनता यांना फॉलो करते मग एक छोटासा संदेश का नाही? बोटावर मोजता येतील एवढ्या कलाकारांनी याविषयी आपले मत व्यक्त केले. खरेतर सिनेमा आणि ते तयार करणारे हे संवेदनशील असतात हा एक गैरसमजच. पैसे हे सर्वथैव.

तळटीप: पाकिस्तानी (उलटे तंगडी) कलाकारांकडून काहीतरी शिका. आपल्याकडे पैसे कमावून ते आज आपल्याविरुद्ध बोलतायत. शेवटी इतकेच म्हणू वाटते जम्मू आणि लडाखची लोक काय म्हणतात यांच्याकडे देखील पहा. कित्येक वर्षांनंतर त्यांना खरेतर श्रीनगरच्या राजकारणापासून मोकळा श्वास मिळाला आहे.

आज पाकिस्तानने या बॉलिवूड वाल्यांच्या फिल्म्स बॅन केल्यात. आतातरी थोडी अक्कल आली तर नशीब. एक मात्र खरे हि फिल्म इंडस्ट्री आहे. आणि कुठल्याही इंडस्ट्रीप्रमाणे यांना देखील टार्गेट, कन्झ्युमर, एक्सपान्शन हे कायम सर्वोच्च राहील. बाकी भावना वगैरे ह्या विकायला असतात.
योगेश कर्डिले | Yogesh Kardile
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
व्यवसायाने छायाचित्रकार असलेले योगेश कर्डिले निसर्गावर असलेल्या प्रेमापोटी सातत्याने भारत भ्रमंती करत असतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.