सांगली येथे आलेल्या पुरात अडकलेल्या आणि संपर्क होऊ न शकलेल्या प्रेयसीसाठी प्रियकराने लिहिलेली कविता
मी इतका दूर असा कीयेणं मला जमलं नाही
बघ्यासारखा बघत राहिलो
मन माझं रमलं नाही
ज्यांना जाता नाही आलं
त्यांनी देवळापुढे तरी हात जोडले
नास्तिकतेचं लेबल लावल्यानं
तेही मला जमलं नाही
किती बाता प्रेमाच्या
संकटसमयी साथ देण्याच्या
तू तिथे संकटात अन्
मला इथे करमलं नाही
पाहिली असशील स्वप्ने
मी बोटीतून येत असल्याची
जाग आल्यावर तुझं मन
माझ्यावर रागावलं नाही?
हळू हळू पूर ओसरत चाललाय
हळू हळू मन शांत होतंय
मन आणि शब्द जागेच होते
फक्त आता राहवलं नाही