मी मर्द मराठीण, मी आहे वाघीण
मी मर्द मराठीणमी आहे वाघीण
तलवार हाती घेईन
लक्ष्मीबाई होईन
इंग्रजांनाही मी
पळवून लावीन
मी मर्द मराठीण
मी आहे वाघीण
मी जिजाऊ होईन
शिवबा घडवीन
हिंदवी स्वराज्याचे
तोरण बांधीन
मी मर्द मराठीण
मी आहे वाघीण
मी सावित्री होईन
घरोघरी जाईन
ज्ञानाचा दिवा
मीच लावीन
मी मर्द मराठीण
मी आहे वाघीण