साबुदाणा फिंगर्स - पाककृती

साबुदाणा फिंगर्स, पाककला - [Sabudana Fingers, Recipe] उपवासाला नेहमीपेक्षा वेगळे खावेसे वाटल्यास चटपटीत, कुरकुरीत ‘साबुदाणा फिंगर्स’ नक्की करून पहा.
साबुदाणा फिंगर्स - पाककला | Sabudana Fingers - Recipe

चटपटीत, कुरकुरीत आणि उपवासाला चालणारे साबुदाणा फिंगर्स

‘साबुदाणा फिंगर्स’साठी लागणारा जिन्नस


 • १ वाटी भिजवलेला साबुदाणा
 • २ उकडून कुस्करलेले बटाटे
 • पाऊण वाटी भाजलेल्या शेंगदाणाचा कुट
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • २ - ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • १ चमचा जीरे
 • चवीनुसार मीठ
 • तळण्यासाठी तेल

‘साबुदाणा फिंगर्स’ची पाककृती


 • साबुदाणा रात्रभर भिजवत ठेवावा.
 • एका बाऊलमध्ये भिजवलेलले साबुदाणे घेऊन २ उकडलेले बटाटे कुस्करून टाकावेत.
 • त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा जीरे आणि चवीनुसार मीठ टाकून एकत्र करून घ्यावेत आणि त्याचा गोळा बनवावा.
 • तयार गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून हाताला तेल लावून लांबट (उभे) असे आकार करून घ्यावेत.
 • आता कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
 • तयार आहेत साबुदाणा फिंगर्स.

गरमागरम साबुदाणा फिंगर्स थंड थंड दह्यासोबत सर्व्ह करावेत.स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.