कोंबडी वडे - पाककृती

कोंबडी वडे, पाककला - [Kombadi Vade, Recipe] मालवण किंवा कोकणातील सुप्रसिद्ध म्हणून ओळखले जाणारे हे खमंग ‘कोंबडी वडे’ चिकनच्या रस्स्यासोबत खातात.
कोंबडी वडे - पाककला | Kombadi Vade - Recipe
कोंबडी वडे (पाककृती), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
मालवण किंवा कोकणातील सुप्रसिद्ध कोंबडी वडे.

कोंबडी वड्याच्या भाजणीसाठी लागणारा जिन्नस

 • १ किलो तांदूळ
 • १ किलो जोंधळे
 • पाव किलो गहू
 • पाव किलो चणाडाळ
 • पाव किलो उडीदडाळ
 • १ वाटी पोहे
 • २० ग्रॅम जीरे
 • २० ग्रॅम मेथी
 • २० ग्रॅम धणे

‘कोंबडी वडे’ साठी लागणारा जिन्नस

 • २ वाट्या कोंबडी वड्याची भाजणी
 • पाव चमचा हळद
 • चवीनुसार मीठ
 • पीठ मळण्यासाठी गरम पाणी
 • तळण्यासाठी तेल

कोंबडी वड्याच्या भाजणीची पाककृती

 • कोंबडी वड्याच्या भाजणीसाठी लागणारा सर्व जिन्नस वेगवेगळा व्यवस्थित भाजून घ्या.
 • सर्व जिन्नस थंड झाल्यावर गिरणीतून जाडसर दळून आणा. ही तयार आहे आपली कोंबडी वड्याची भाजणी.

कोंबडी वड्याची पाककृती

 • २ वाट्या (आवश्यकतेनुसार) कोंबडी वड्याची भाजणी परातीत काढून घ्या.
 • आता त्यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घाला.
 • यामध्ये थोडे थोडे गरम पाणी (सोसेल एव्हढे) घालून कणीकासारखे पीठ मळून अर्धा तास झाकून ठेवा.
 • कढईत वडे तळण्यासाठी तेल तापवत ठेवा. गॅस मध्यम आचेवर ठेवा.
 • तयार पीठाचे पुरीला करतो तितके लहान लहान गोळे बनवीन घ्या.
 • आता एका प्लास्टिक पिशवीला (दुधाची पिशवी) तेलाचे बोट लावून हा तयार गोळा पिशवीवर ठेवून गोल आकारात वडे थापा.
 • थापल्यावर बरोबर मध्ये बोटाच्या सहाय्याने भोक पाडून तयार वडा हळूवार पणे पिशवीवरून काढून तापलेल्या तेलात सोडा.
 • तेलामध्ये दोन्ही बाजूने व्यवस्थित फुगवून तळून घ्या.
 • चिकनच्या रस्स्यासोबत गरमागरम कोंबडी वडे सर्व्ह करा.
वडे थापल्यावर वड्याला भोक पाडले नाही तरी चालेल.
कोंबडी वडे तुम्ही गरमागरम चहासोबतही खाऊ शकता.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.