कुळीथाचे पिठले - पाककृती

कुळीथाचे पिठले, पाककला - [Kulithache Pithale, Recipe] खेड्यपाड्यात सर्रास बनविले जाणारे चविष्ट, खमंग आणि पोष्टिक असलेले ‘कुळीथाचे पिठले’ रोजरोजच्या भाज्या, आमटीला एक चांगला पर्याय आहे.
कुळीथाचे पिठले - पाककला | Kulithache Pithale - Recipe

अस्स्ल गावरान पद्धतीचं कुळीथाचे पिठले

‘कुळीथाचे पिठले’साठी लागणारा जिन्नस
 • १ वाटी कुळीथ पीठ
 • १ बारीक चिरलेला कांदा
 • २ - ३ आमसुले
 • १ चमचा आलं - लसूण पेस्ट
 • ३ - ४ हिरव्या मिरच्या
 • ७ - ८ कडिपत्त्याची पाने
 • १ चमचा किसलेला ओला नारळ
 • पाव चमचा हळद
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • छोटासा आल्याचा तुकडा
 • चवीनुसार मीठ
 • १ मोठा चमचा तेल
 • २ - ३ वाट्या पाणी

‘कुळीथाचे पिठले’ची पाककृती
 • एका भांड्यात तेल गरम करून घ्या. तेल तापल्यावर आलं - लसूण पेस्ट टाकून परतून घ्या.
 • आता त्यामध्ये कडिपत्त्याची पाने, हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून व्यवस्थित परतून घ्या.
 • त्यामध्ये कांदा टाकून मऊ होईपर्यंत परतून घ्या. कांदा मऊ शिजल्यावर त्यामध्ये २ वाट्या पाणी घालून उकळी काढा.
 • उकळी येईपर्यंत एका वाटीत कुळीथ पीठ घेऊन थोडेसे पाणी ओता आणि त्याची पेस्ट बनवा.
 • भांड्यामध्ये उकळी आल्यावर ही पेस्ट त्यामध्ये ओता. नंतर त्यामध्ये आमसुले व किसलेला ओला नारळ घालून व्यवस्थित ढवळून घ्या. गुठळ्या राहणार नाही याकडे लक्ष द्या.
 • आमसुलं असल्यामुळे चवीनुसार मीठ टाका.
 • पिठले घट्ट करायचे नसल्यामुळे त्यामध्ये पाणी अजून वाढवूही शकता. त्यामुळे पाणी व्यवस्थित घालून एक उकळी आणा.
 • एक चांगली उकळी आली कि त्यावर कोथिंबीर पसरून गॅस बंद करा.
 • मासे शिजल्यावर गॅस बंद करा.

तयार आहे कुळीथाचे पिठले. गरम गरम भातासोबत गरमागरम कुळीथाचे पिठले सर्व्ह करा.


स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.