सुरळीची वडी / खांडवी - पाककृती

सुरळीची वडी / खांडवी, पाककृती - [Suralichi Wadi / Khandvi, Recipe] महाराष्ट्रात सुरळीची वडी व गुजरातमध्ये खांडवी नावाने प्रसिद्ध असलेल्या पारंपारिक पदार्थाची पाककृती.
सुरळीची वडी / खांडवी - पाककृती | Suralichi Wadi / Khandvi - Recipe

नैवेद्याच्या ताटाला सुशोभीत करणारी लुसलुशीत अशी पारंपारीक सुरळीची वडी (खांडवी)

‘सुरळीची वडी / खांडवी’साठी लागणारा जिन्नस
 • १ वाटी बेसन (चनाडाळीचे पीठ)
 • १ वाटी दही (२ वाट्या ताक)
 • पाव चमचा हळद
 • चवीनुसार मीठ
 • १ चमचा आलं लसुण पेस्ट (मिरची)
 • किसलेला ओला नारळ
 • १ चमचा तेल
 • १ चमचा मोहरी
 • १ चमचा सफेद तीळ
 • १ ग्लास पाणी
 • कोथिंबीर

‘सुरळीची वडी / खांडवी’ची पाककृती
 • एका भांड्यात बेसन व दही (ताक) घेऊन व्य्वस्थित ढवळून घ्या (गुठळ्या ठेवू नये).
 • बेसन ताकाच्या मिश्रणात हळद, आलं-लसूण पेस्ट, मीठ (दही आंबट असल्यास चवीनूसार मीठ टाकावे) पाणी टाकावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे, आता मिश्रण तयार आहे.
 • एका पातेलीत किंवा पॅनमध्ये हे मिश्रण ओतावे, उकळी आल्यानंतर मंद आचेवर सतत ढवळत रहावे (गुठळ्या होऊ देऊ नये).
 • मिश्रण तयार झाले का नाही हे ओळखण्यासाठी एका डिशच्या मागच्या बाजूला हे मिश्रण थोडेसे ओतून पसरावे व थंड झाल्यावर सुरीच्या सहाय्याने सुरळी होते का ते बघावे; जर सुरळी होत असेल तर गॅस बंद करावा अन्यथा मिश्रण ढवळत रहावे.
 • साधारण १५ मिनिटे नंतर हे मिश्रण तयार झाल्यावर गॅस बंद करावा.
 • एका ताटलीच्या मागच्या बाजूला तेल पसरून घ्यावे व त्यावर २-३ चमचे मिश्रण टाकून उलथन्याच्या सहाय्याने सर्वत्र पातळ पसरून घ्यावे.
 • साधारण २ ताटापूरते मिश्रण तयार होते.
 • दोन्ही ताटाला मिश्रण पसरल्यावर साधारण ५ मिनिटे थंड होण्यासाठी ठेवावे.
 • थंड झाल्यावर सुरीच्या सहाय्याने भाग पाडावेत.
 • भाग पाडल्यावर सुरीच्या सहाय्याने टोक उचलावे व बोटाने गोलगोल सुरळी करून घ्यावी.
 • अशा प्रकारे सर्व सुरळीच्या वड्या करून घ्याव्यात; एका प्लेटमध्ये ह्या वड्या किंवा खांडवी काढून घ्याव्यात.
 • आता एका फोडणीच्या भांड्यात २ चमचे तेल टाकून गरम करून घ्यावे. तेल गरम झाल्यावर मोहरी टाकावी.
 • मोहरी तडतडल्यावर सफेद तीळ, कडीपत्ता टाकावा.
 • तयार फोडणी सुरळीच्या वड्यांवर पसरावी; त्यावर किसलेला ओला नारळ व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करावे.


स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.