माशाचं मालवणी तिकलं - पाककृती

माशाचं मालवणी तिकलं, पाककला - [Mashacha Malvani Tikla, Recipe] मालवणी पद्धतीचे, तोंडाला पाणी आणणारे प्रसिध्द ‘माशाचं मालवणी तिकलं’ चवीला सुंदर लागते.
माशाचं मालवणी तिकलं - पाककला | Mashacha Malvani Tikla - Recipe

मालवणी पद्धतीचं ‘माशाचं मालवणी तिकलं’.

‘माशाचं मालवणी तिकलं’साठी लागणारा जिन्नस

 • ८ - १० आवडीच्या माशांचे तुकडे
 • १० - १२ बेडगी मिरच्या
 • ३ - ४ तिरफळ
 • ७ - ८ लसूण पाकळ्या
 • १ टोमॅटो
 • अर्धा कांदा
 • १ टेबलस्पून धणे
 • पाव चमचा हळद
 • ७ - ८ आमसूले
 • छोटासा आल्याचा तुकडा
 • १ मोठा चमचा तेल
 • पाणी
 • चिमुटभर हिंग
 • चवीनुसार मीठ

‘माशाचं मालवणी तिकलं’ची पाककृती

 • माश्याचे तुकडे स्वच्छ धुवून बाजूला ठेवा.
 • मिक्सरच्या भांड्यात नारळ, बेडगी मिरच्या, तिरफळ, लसूण पाकळ्या, टोमॅटो, धणे, हळद, आलं आणि अर्ध्या कांद्यातला एक तुकडा टाकून वाटण तयार करा.
 • जाड बुडाच्या भांड्यात १ मोठा चमचा तेल टाकून त्यात हिंग व उरलेला कांदा बारीक चिरून परता.
 • कांदा लालसर झाल्यावर त्यामध्ये तयार वाटण टाकून व्यवस्थित ढवळून घ्या.
 • यामध्ये एक पेला पाणी ओतून मिश्रणाला उकळी येऊ द्या.
 • एक उकळी आल्यावर माशांचे तुकडे व आमसुले टाकून व्यवस्थित शिजवून घ्या.
 • आमसुलं असल्यामुळे चवीनुसार मीठ टाका.
 • मासे शिजल्यावर गॅस बंद करा. तयार आहे माशाचं मालवणी तिकलं.

टिप: माशाचं मालवणी तिकलं हे घट्टसर असते त्यामुळे त्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमीच ठेवावे. हे तिकलं भातासोबत खायला द्या.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.