कोळंबी फ्राय - पाककृती

कोळंबी फ्राय, पाककला - [Kolambi Fry, Recipe] सोप्पी आणि झटपट होणारी मांसाहारी पाककृती ‘कोळंबी फ्राय’ स्टार्टरसाठी एक चांगला पर्याय आहे.
कोळंबी फ्राय - पाककला | Kolambi Fry - Recipe

सोप्पी आणि झटपट होणारी मांसाहारी पाककृती कोळंबी फ्राय

‘कोळंबी फ्राय’साठी लागणारा जिन्नस

 • ८ - १० (किंवा गरजेनुसार) सोललेली कोळंबी
 • २ चमचे कोकम आगळ/२ - ३ आमसुले/ चिंचेची चटणी
 • १ चमचा तिखट (मालवणी मसाला)
 • पाव चमचा हळद
 • चिमूटभर हिंग
 • २ मोठे चमचे तेल
 • चवीनुसार मीठ

‘कोळंबी फ्राय’ची पाककृती

 • सर्वप्रथम कोळंबी व्यवस्थित आवरण काढून स्वच्छ धुवून घ्याव्यात. (आवरण कसे काढायचे ते खाली व्हिडिओमध्ये दाखविले आहे.)
 • स्वच्छ केलेली कोळंबी एका बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये कोकम आगळ, तिखट (मालवणी मसाला), हळद, हिंग व कोकम आगळ असल्यामुळे चवीनुसार मीठ घालावे.
 • आता हा सर्व मसाला कोळंबीला व्यवस्थित लावून घ्यायचा.
 • मसाला लावलेली कोळंबी साधारण ५ - १० मिनिटे मुरण्यासाठी ठेवून द्यावीत.
 • आता एका पॅनमध्ये तेल पसरून घ्यावे. त्यावरती मसाला लावलेली कोळंबी ठेवावीत.
 • ५ मिनिटे झाकून ठेवावे. झाकण काढून एका बाजूने शिजली का ते पहावीत.
 • शिजल्यावर कोळंबी पलटून दुसरी बाजूही शिजवून घ्यावी.
 • दोन्ही बाजू व्यवस्थित शिजल्यावर प्लेटमध्ये काढून घ्यावीत आणि त्यावर लिंबू पिळून गरमागरम सर्व्ह करावीत.
गरमा गरम कोळंबी फ्राय पाव किंवा चपातीसोबत छान लागतील.

स्टार्टरसाठी मांसाहारी पदार्थ म्हणून तुम्ही कोळंबी फ्राय करू शकता.


स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.