आणि मी विचार करतोय जगाचा - मराठी कविता

आणि मी विचार करतोय जगाचा, मराठी कविता - [Aani Me Vichar Kartoy Jagacha, Marathi Kavita].

मी बसलोय एका बंधिस्त खोलीमध्ये

मी बसलोय एका बंधिस्त खोलीमध्ये
आणि मी विचार करतोय जगाचा

मला इथे आहे दोन वेळच्या जेवणाची शंका
आणि मी विचार करतोय जगाचा

माझी जवळची माणसही मला सांभाळता येत नाही
आणि मी विचार करतोय जगाचा

मला दोन रुपये कमवायची अक्कल नाही
आणि मी विचार करतोय जगाचा

माझ्या डोक्यावर आज राहायला छत नाही
आणि मी विचार करतोय जगाचा

मला काय दिलेय समाजाने एक विचार येतोय मनात
आणि मी विचार करतोय जगाचा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.